News Flash

VIDEO : घरच्या घरी बनवा ‘इको-फ्रेण्डली पेपर डस्टबिन बॅग’

व्हिडिओच्या मदतीने तुम्हीसुध्दा घरच्याघरी अशी बॅग बनवू शकता.

VIDEO : घरच्या घरी बनवा ‘इको-फ्रेण्डली पेपर डस्टबिन बॅग’
इको-फ्रेण्डली पेपर डस्टबिन बॅग

प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरणाला घातक असून, पर्यायाने मानव तसेच प्राणिमात्रांच्या आरोग्यालादेखील याचा धोका आहे. तसेच पावसाळ्यात मुंबईसारख्या शहरी भागात प्लास्टिकचा उपद्रव प्रकर्षाने जाणवतो. प्लास्टिकच्या अनियंत्रित वापरामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा होऊन शहरातील रस्ते जलमय होतात आणि थोड्याश्या पावसातदेखील पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते. प्लास्टिकच्या उपद्रवापासून थोड्या प्रमाणात तरी मुक्ती मिळावी म्हणून सरकारने काही प्लास्टिकच्या वस्तूंवर बंदी घातली आहे. तसेच बंदी असलेली प्लास्टिकची वस्तू वापरताना आढळल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. आता अनेकजण प्लास्टिकला पर्याय शोधू लागले आहेत. याचाच एक भाग म्हणून लोकसत्ता डॉट कॉमनेदेखील वाचकांसाठी ‘इको-फ्रेण्डली पेपर डस्टबिन बॅग’ कशी बनवावी याचा व्हिडियो आणला आहे. ही ‘इको-फ्रेण्डली पेपर डस्टबिन बॅग’ बनविण्यास अतिशय सोपी असून या व्हिडिओच्या मदतीने तुम्हीसुध्दा घरच्याघरी अशी बॅग तयार करू शकता.

व्हिडिओ पाहा:

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2018 9:34 am

Web Title: how to make eco friendly paper dustbin bag
Next Stories
1 क्षयावरची लस पित्ताशयाचा कर्करोग रोखण्यास उपयुक्त
2 असे ट्रान्सफर करा तुमचे पीपीएफ खाते  
3 मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी बंद होणार?
Just Now!
X