14 November 2019

News Flash

काही सेकंदात कोल्ड कॉफी कशी बनवायची?

कोल्ड कॉफी हा आजच्या तरूण पिढीचा जीव की प्राण आहे

कोल्ड कॉफी हा आजच्या तरूण पिढीचा जीव की प्राण आहे. अनेक जण कॉलेजमधून बाहेर पडल्यावर किंवा क्लासमधून सुटल्यावर जवळच्या ठिकाणावर कोल्ड कॉफीचा आस्वाद घेतातच. थडी असो वा उन्हाळा कोल्ड कॉफी प्यायला सगळेच उत्सुक असतात. घरच्या घरी अगदी काही सेकंदात कोल्ड कॉफी बनविण्याची रेसिपी आज येथे देत आहोत. तुम्हाला ती आवडली तर नक्की कळवा…
साहित्य
१०० मिली गरम पाणी
३०० मिली दूध
२ चमचे इन्स्टंट कॉफी
२ चमचे व्हॅनिला एक्सट्रॅक्ट
१ चमचा मध
१ चमचा साखर
१ वाटी बर्फाचे तुकडे
पद्धत
दोन चमचे इन्स्टंट कॉफी आणि १०० मिली गरम पाणी एकत्र करून ते मिक्सरच्या साह्याने छान घुसळून घ्या. जोपर्यंत कॉफी पूर्णपणे विरघळत नाही, तोपर्यंत घुसळा. त्यानंतर त्यामध्ये साखर, मध आणि व्हॅनिला एक्सट्रॅक्ट घाला. हे मिश्रण पुन्हा एकदा घुसळून घ्या आणि त्यामध्ये दूध घाला. दूध घातल्यावर पुन्हा घुसळा आणि त्यात बर्फाचे तुकडे आवश्यकतेप्रमाणे घाला. यानंतर पूर्ण मिश्रण पुन्हा एकदा घुसळा. तुमची कोल्ड कॉफी तयार झाली आहे. काचेच्या ग्लासमधून तुम्ही ती सर्व्ह करू शकता.

First Published on September 10, 2015 1:44 pm

Web Title: how to make homemade iced coffee in 39 seconds
टॅग Food,Lifestyle