News Flash

३० मिनिटात बनवा प्रोटीन युक्त लाडू

प्रोटीन युक्त लाडू बनवण्यासाठी हा व्हिडीओ नक्कीच पाहा.

तुम्हाला कधी अचानक खूप कंटाळ आला आणि काही खाण्याची इच्छा झाली. तर तेव्हा तळलेले आणि साखरचे पदार्थ खाणे टाळा. घरगुती प्रोटीन युक्त लाडू खा ज्याने तुम्हाला ताकद तर मिळेल. सोबतच तुम्हाला लवकर भूकही लागणार नाही आणि तुमचं वजन ही वाढणार नाही. या विशेष प्रोटीन लाडूंची रेसीपी ही बॉलिवूडमधील अनेक लोकप्रिय अभिनेत्रींची फिटनेस ट्रेनर असणाऱ्या यास्मिन कराचीवालाने दिली आहे. यास्मिनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही रेसिपी शेअर केली आहे. तर चला पाहूया कसे बनवायचे प्रोटीन युक्त लाडू…

लाडू बनवण्यासाठी लागणारी सामग्री

१२० ग्रॅम – लाल खजूर
२ चमचे – बारीक कापलेले बदाम
२ चमचे – फ्लेक्ससीड पावडर
२ चमचे – चिया बियाणाचे पूड
२ चमचे – कोको पावडर
२ चमचे – चिरलेले काळे मनुके
१ चमचा – आल्याचा रस
½ चमचा – वेलची पूड
१ चमचा – बदामाचे तेल
¼ चमचा – दालचिनी पावडर

लाडू बनवण्याची कृती

सगळ्यात आधी सगळे साहित्य मिक्स करा.

लिंबाच्या आकाराचे लाडू बनवा.

सुकलेल्या नारळाच्या किसात त्यांना रोल करा

१५ मिनिटे थंड होऊ द्या

लाडू तयार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 6:46 pm

Web Title: how to make protein ladoo withing 30 min dcp 98
Next Stories
1 7000mAh बॅटरीच्या Samsung Galaxy F62 वर वाचवा 2,500 रुपये; जाणून घ्या पूर्ण ऑफर
2 Samsung ची नवीन सेवा, लॅपटॉपवरुन पाठवता येणार SMS
3 Gionee Max Pro : सात हजारांपेक्षा कमी किंमतीत 60 तास बॅटरी बॅकअप + 6000mAh बॅटरी
Just Now!
X