News Flash

Merry Christmas 2018 : …म्हणून २५ डिसेंबर रोजी साजरा केला जातो ख्रिसमस

येशूंनी दिलेला मार्ग प्रेम आणि पवित्रतेवर आधारित होता त्यांच्या या संदेशामुळे जगात एक नवी पहाट निर्माण झाली.

२५ डिसेंबर हा दिवस येशू ख्रिस्तांची जयंती किंवा ख्रिसमस म्हणून सर्व जगभर साजरा केला जातो. जरी हे सत्य असले की नाताळ हा दिवस येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो त्याबरोबरच हा दिवस अध्यात्माचे आपल्या जीवनातील महत्त्व अधोरेखित करण्याचे प्रतीक आहे. प्रभू येशू ख्रिस्त हे दिव्यत्वाचा अवतार मानले जातात. त्यांचा जन्म अशा काळात झाला त्या वेळी अज्ञान, अंधकार, लोभ, हिंसा, दांभिकता, अंधश्रद्धा या दुर्गुणांचा प्रभाव जगावर निर्माण झाला होता. करुणा, पवित्रता आणि नैतिकतेचा वसा जणू काही मानव जात विसरलीच की काय अशी परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती.या काळात प्रभू येशूंचा जन्म झाला आणि त्यांनी लाखो लोकांचे आयुष्य प्रकाशमान केले. येशू ख्रिस्ताने सामान्य माणसाच्या आयुष्याला नवे आणि आध्यात्मिक वळण दिले. येशूंनी दिलेला मार्ग प्रेम आणि पवित्रतेवर आधारित होता त्यांच्या या संदेशामुळे जगात एक नवी पहाट निर्माण झाली.

ज्या काळात ईश्वराचा शोध किंवा उच्च आध्यात्मिक जीवनाचा ध्यास ही ध्येय परंपरा मिटली होती त्या काळात येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. त्या काळी सामान्य माणूस लोभ, काम, गर्व, अहंकार या दुर्गुणांनी ग्रासलेला होता. जेव्हा एखादा साधक दिव्यत्वाच्या दिशेनी वाटचाल करतो, पवित्रता आणि भक्तीच्या पंथावर तो मार्गस्थ होतो तेव्हा त्याच्या हृदयात येशूचे दिव्यत्व अंकुरित होते. मागील आयुष्यातील अंधकाराचे युग संपून एका नव्या प्रकाशमान युगाकडे त्या व्यक्तीची वाटचाल होते याचेच प्रतीक म्हणून जगभरात ख्रिसमस साजरा केला जातो. केवळ त्याच व्यक्तीच्या आयुष्यात दिव्यत्वाची पहाट उगवते जो नम्र आणि विनयशील आहे. सर्व तत्वांमध्ये आणि गुणांमध्ये नम्रता हा श्रेष्ठ गुण आहे. त्यानंतर साधेपणा, पवित्रता, भौतिक सुखांची लालसा त्यागणे आणि ज्ञान ग्रहण करण्याची वृत्ती हे गुण महत्त्वपूर्ण आहेत. प्रभू येशूचे आयुष्य आपल्याला सद्गुणांचे स्मरुन देत राहील हाच संदेश मनात ठेवून जगभरात हा आनंदोत्सव साजरा केला जातो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2018 9:00 am

Web Title: how to make start a christmas tree farming and how much income can christmas tree farming produce 2
Next Stories
1 National Consumers day : ग्राहक म्हणून तुम्हाला या हक्कांबद्दल माहित आहे का?
2 नकारात्मक भावना प्रकृती अस्वास्थ्याचे निदर्शक
3 हिवाळ्यात सांधेदुखी दूर ठेवण्यासाठी..
Just Now!
X