15 August 2020

News Flash

Dessert Recipes for Valentine’s Day : स्ट्रॉबेरी चीज केक

Valentine's Day चे औचित्य साधत आम्ही तुमच्यासाठी खास रेसिपी घेऊन आलो आहे...

– शेफ मेराजुद्दीन अन्सारी, फोर पॉइंट्स शेरेटन, नवी मुंबई

 साहित्य :

एक बॉक्स डार्क चॉकलेट मिश्रण आणि बॉक्सवरील साहित्य
पाव कप बटर
एक आणि एक तृतीयांश कप व्हिपिंग क्रीम
ए 10-ओझेड पॅकेज बिटरस्वीट चॉकलेट मॉर्सेल्स
8 औंस सेमी- स्वीट चॉकलेट चिप्स
3-4 कप ताज्या, कापलेल्या स्ट्रॉबेरीज
उंचीनुसार मध्यभागी कापलेल्या 6 स्ट्रॉबेरीज
पाव कप व्हाइट चॉकलेट
अर्धा कप तेल

कृती  :

-पॅकेटवर दिलेल्या सूचनांनुसार केक तयार करा. 9×13 इंची पॅनमध्ये केक बेक करा. एक तास थंड होऊ द्या.

-दरम्यान एका लहान भांड्यात बटर व क्रीम एकत्र करून मध्यम आचेवर सेट करा. मिश्रणाला उकळी आल्यानंतर त्यात बिटरस्वीट आणि सेमी- स्वीट चॉकलेट घालून आच बंद करा. मिश्रण दोन मिनिटे तसेच ठेवा आणि नंतर मुलायम होईपर्यंत ढवळा.

– सुरीच्या सहाय्याने केकचे एक इंची तुकडे करा आणि त्यातील निम्मे तुकडे मिक्सिंग बाउलमध्ये घाला. केकचे पूर्णपणे तुकडे होईपर्यंत कमी वेग ठेवून बीट करा.

– मिक्सिंग बाउलमध्ये सव्वा कप गनाश घाला. केकचे उरलेले तुकडे घाला आणि एकजीव होईपर्यंत बीट करा.

-कापलेल्या स्ट्रॉबेरीज घालून मिश्रण एकत्र करण्यासाठी लाकडी चमचा वापरा. आणि सगळं मिश्रण खाऊ नका.

-9 इंची स्प्रिंग फॉर्म पॅन घ्या आणि त्याच्या तळाला गोलाकार वॅक्स पेपर घाला. केक पॅनमध्ये ओता किंवा चमच्याने घाला. हे मिश्रण वरून एकसारखे करून घ्या.

-45 मिनिटे प्लॅस्टिक रॅपने झाकून ठेवा. टायमर सेट करा. तुम्हाला हे मिश्रण खूप थंड करायचे नाहीये, तर केवळ घट्ट करायचे आहे. जर नंतर फ्रॉस्ट करणे शक्य नसेल, तर फ्रीजमध्ये ठेवा.

-पॅनच्या कडेने सुरी फिरवून कडा हलक्या हाताने सोडवून घ्या. केक स्टँड किंवा ताटलीमध्ये केक उलट करून काढा आणि आता वरती आलेला तळाचा वॅक्स पेपर काढा.

-वरचा भाग आणि केकच्या कडा राखून ठेवलेल्या गनाशने काळजीपूर्वक फ्रॉस्ट करा. हो, गनाश खूप पातळ असते. केक अद्याप थँड असेल, तर तो काही मिनिटांसाठी परत फ्रीजमध्ये ठेवा.

-लहान बाउलमध्ये व्हाइट चॉकलेट आणि तेल एकत्र करा. चॉकलेट वितळेपर्यंत मायक्रोवेवकरा आणि मुलायम होईपर्यंत ढवळाय केकवर व्हाइट चॉकलेट भुरभुरा. मी व्हाइट चॉकलेट प्लॅस्टिक बॅगमध्ये घालून केकवर त्याचा एक ठिपका दिल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2020 4:15 pm

Web Title: how to make strawberry cheesecake executive chef merajuddin ansari valentines day sas 89
Next Stories
1 Samsung चा नवा फोल्डेबल फोन झाला लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
2 पुणे-शिर्डी हेलीकॉप्टर सेवा; ५० मिनिटांमध्ये साईबाबांच्या चरणी
3 येतेय Nissan ची नवी SUV ; मारुती Brezza, Hyundai Venue ला देणार टक्कर
Just Now!
X