28 November 2020

News Flash

घरच्या घरी असे बनवा सनस्क्रीन लोशन

कडक उन्हापासून आपल्या त्वचेचा बचाव करण्यासाठी सनस्क्रीन लोशन लावणे हा एक उत्तम मार्ग आहे.

मे महिना म्हणजे उन्हाचा तडाखा आणि त्यामुळे त्वचेला होणारा त्रास. बाहेर जाणे तर गरजेचे असल्याने या कडक उन्हापासून आपल्या त्वचेचा बचाव करण्यासाठी सनस्क्रीन लोशन लावणे हा एक उत्तम मार्ग आहे. उन्हामुळे त्वचेला होणारा त्रास सनस्क्रीनमुळे कमी होतो. उन्हाचा तडाखा जास्त असल्यास चेहऱ्यावर तसेच हातांवर काळे डाग येणे, रॅश आल्यासारखे दिसणे, पांढरे डाग पडणे यांसारखे परिणाम दिसून येतात. मात्र सनस्क्रीन लोशन लावल्याने या परिणामांचे प्रमाण कमी होते. आता हे सनस्क्रीन लोशल कोणत्या कंपनीचे, किती एसपीएफ असलेले घ्यावे याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न असतात. तसेच या उत्पादनांमधील घटक काहीवेळा त्वचेसाठी हानीकारक ठरु शकतात. अशावेळी घरच्या घरी सनस्क्रीन लोशन तयार करुन ते लावल्यास? आता घरी सनस्क्रीन कसे बनवायचे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी आम्ही काही खास गोष्टी घेऊन आलो आहोत. शिवानी दीक्षित यांनी घरच्या घरी सनस्क्रीन कसे बनवता येते हे सांगितले आहे. यामुळे तुमच्या त्वचेचे उत्तम पद्धतीने पोषण होण्यासही मदत होऊ शकते.

असे बनवा सनस्क्रीन लोशन

घटक पदार्थ –

१. खोबरेल तेल (मॉईश्चरायझर आणि एसपीएफ) – अर्धी वाटी
२. बदाम तेल (मॉईश्चरायझर आणि एसपीएफ) – अर्धी वाटी
३. बीज वॅक्स (वॉटरप्रूफ आणि बॅक्टेरियाला प्रतिबंध करण्यासाठी) – दोन चमचे
४. बटर – दोन चमचे
५. व्हिटॅमिन ई तेल – दोन चमचे
६. गाजरांच्या बियांचे तेल – १५ थेंब
७. लवेंडर तेल – १० थेंब
८. फार बारीक नसलेली जस्ताची पावडर – २ चमचे

कृती –

* एका उष्णता रोधक भांड्यामध्ये खोबरेल तेल आणि बदाम तेल एकत्र करा. त्यानंतर त्या बीज वॅक्स आणि बटर एकत्र करा. तुम्हाला सनस्क्रीन थोडे घट्ट हवे असेल तर वॅक्स जास्त घाला. त्यानंतर हे थोडेसे गरम करा.

* दुसऱ्या एका भांड्यात दोन किंवा तीन व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल घ्या. त्यात जस्ताची पावडर घालून हे मिश्रण योग्य पद्धतीने एकत्र करा.

* गाजराच्या बियांचे तेल आणि लवेंडर तेलाचे यामध्ये एकत्र करुन हे मिश्रण नीट ठेवून द्या.

* हे मिश्रण थंड ठिकाणी आणि सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात येणार नाही असे ठेवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 2:29 pm

Web Title: how to make sunscreen lotion at home
Next Stories
1 जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा २१९ रुपयांचा प्लॅन
2 बदाम सेवनाने हृदयरोगाचा धोका दूर
3 युट्यूबने ५० लाख व्हिडीयो डिलीट केले कारण…
Just Now!
X