चेहऱ्याची त्वचा सुंदर आणि नितळ असावी असे सगळ्यांना वाटणे अगदीच साहजिक आहे. मुली किंवा मुले दोघांसाठीही चेहऱ्याची त्वचा तितकीच महत्त्वाची असते. वाढते प्रदूषण, खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीतील इतर बदल यांमुळे त्वचा खराब होते. यामध्ये त्वचेवर फोड येणे, खड्डे पडणे, त्वचा काळवंडणे, ब्लॅकहेडस किंवा व्हाईटहेडस येणे अशा तक्रारी उद्भवतात. मग बाजारात मिळणारी विविध महागडी सौंदर्यप्रसाधने वापरणे किंवा पार्लरमध्ये जाणे यांसारखे पर्याय स्विकारले जातात. मात्र त्यामुळे तात्पुरता उपयोग होतो आणि पुन्हा काही दिवसांत ‘जैसे थे’ परिस्थिती उद्भवते. मात्र घरच्या घरी तेही फळांपासून चेहऱ्याचे फेशियल करता आले तर? यामुळे चेहरा नितळ आणि उजळ होण्यास निश्चितच मदत होईल. अशाप्रकारे केलेले फेशियल चेहऱ्याला पोषण देणारे ठरते. पाहूया काय आहे हे फ्रूट फेशियल आणि त्यातील महत्त्वाच्या पायऱ्या…

क्लिंजिंग – फेशियल करण्यापूर्वी तो स्वच्छ करणे अतिशय महत्त्वाचे असते. यासाठी अतिशय सोपा उपाय म्हणजे कापसाचा बोळा दुधात भिजवून त्याने चेहरा स्वच्छ करा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या. त्यामुळे चेहऱ्यावर चिकटलेले कण निघून जाण्यास मदत होईल.

How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
man died due to lightning fall in unseasonal stormy rain
बुलढाणा : वादळी पाऊस, गारपीटपासून जीव वाचवण्यासाठी ‘पोकलॅन’खाली आसरा घेतला; मात्र…
How to soften your face with Malai Dry Skin Care
Skin Care: दुधाची २ चमचे साय घ्या आणि उन्हाने काळवंडलेल्या-निस्तेज चेहऱ्यावर करा जादू
Marriage to a minor girl
पुणे : अल्पवयीन मुलीशी विवाह, मारहाण करून गर्भपात; पतीसह पाचजणांवर गुन्हा

स्क्रब – चेहऱ्याच्या रंध्रांमध्ये अडकलेले कण निघून जाणे अतिशय आवश्यक असते. त्यासाठी चेहऱा योग्य पद्धतीने स्क्रब करणे आवश्यक असते. बाजारात मिळणाऱ्या विविध प्रकारच्या स्क्रबमध्ये रासायनिक घटक असल्याने ते आरोग्यासाठी अपायकारक असतात. त्यामुळे घरच्या घरी स्क्रबर तयार केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. एक चमचा ओटस, १ चमचा लिंबाचा रस आणि लिंबाची वाळलेली साले, थोडेसे गुलाब पाणी यांचे मिश्रण एकत्र करुन घ्यावे. चेहरा आणि मान यावर हे मिश्रण गोलाकार पद्धतीने लावावे. यामुळे त्वचा स्वच्छ आणि मुलायम होण्यास मदत होते.

चेहरा स्वच्छ करावा – घरगुती स्क्रबर केल्याने त्यामध्ये कोणत्याही प्रकारची रसायने नसतात. त्यामुळे त्याचा चेहऱ्याला त्रास होत नाही. हा स्क्रबर १० मिनिटे चेहऱ्यावर ठेवल्यानंतर चेहऱ्याला मध लावून चेहरा स्वच्छ धुवावा. मध हा ब्लीचप्रमाणे काम करतो. चेहरा उजळण्यासाठी मधाची निश्चितच मदत होते.
चेहऱ्यावरील रंध्रे उघडण्यासाठी वाफ घ्या – चेहऱ्यावरील छिद्रे उघडावीत यासाठी चेहऱ्यावर वाफ घेणे हा उत्तम उपाय आहे. पाणी चांगले उकळून त्याची ५ मिनिटे वाफ घ्या त्यामुळे रंध्रे मोकळी होण्यास मदत होईल.

फ्रूट फेशियल – टोमॅटो आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण करा. हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेऊन २० ते ३० मिनिटे गार करा. त्यानंतर ते फ्रिजमधून बाहेर काढून त्यात १ चमचा मध घाला. आता हे मिश्रण चेहरा आणि मानेला व्यवस्थितपणे लावा. १५ मिनीटांनी मिश्रण वाळल्यानंतर ते धुवून टाका. यामध्ये तुम्ही केळ्यासारख्या फळांचा गरही घालू शकता.

मॉईश्चराईज – फ्रूट फेशियल केल्यानंतर त्वचेला मॉईश्चराईज करणे अतिशय महत्त्वाचे असते. त्यामुळे त्वचेतील आर्द्रता टिकून राहण्यास मदत होते आणि चेहरा उजळ दिसण्यास मदत होते. यासाठी काकडी बारीक करा. त्याचा गर चेहऱ्यावर आणि मानेवर योग्य पद्धतीने लावून घ्या. १० मिनिटांनी हा गराचा लेप वाळल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा.