News Flash

घरच्या घरी असे बनवा फेस स्क्रब

नितळ आणि सुंदर त्वचेसाठी टिप्स

आपल्या चेहऱ्य़ाची त्वचा सुंदर आणि नितळ असावा असे प्रत्येक स्त्रीला वाटते. ही त्वचा नितळ असावी यासाठी महिला अनेक उपाय करतात. कधी बाजारात मिळणारी महागडी उत्पादने वापरणे तर कधी पार्लरमध्ये जाऊन चेहऱ्याचे सौंदर्य खुलविण्याचे उपाय केले जातात. बाजारातील उत्पादने चेहऱ्यासाठी घातक ठरु शकतात. त्यामुळे त्वचेच्या समस्या उद्भवण्याचीही शक्यता असते. मात्र, घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास चेहऱ्याची त्वचा उजळण्यास मदत होते. नैसर्गिक घटक आरोग्यासाठी केव्हाही जास्त चांगले. पाहुयात अशाच नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन स्क्रब कसे करावेत.

बनाना स्क्रब

चेहऱ्याच्या त्वचेवर अतिशय उपयुक्त असे हे स्क्रब आहे. दोन केळी कुसकरुन घ्या. त्यामध्ये पीठी साखर घाला. यामध्ये एक चमचा मध घाला. त्यामुळे या स्क्रबमध्ये आर्द्रता येईल. हे सगळे मिश्रण एकत्र करुन ते चेहऱ्यावर योग्य पद्धतीने लावावे. पाच मिनिटांनी हे मिश्रण गार पाण्याने धुवून टाकावे. यामुळे चेहरा नितळ होण्यास मदत होते.

दही आणि पपईचे स्क्रब

दही, पपईचा गर आणि मध चांगल्या पद्धतीने एकत्र करा. एकत्र केलेले हे स्क्रब चेहऱ्याला चांगल्या पद्धतीने लावा. जवळपास सात मिनिटे हे स्क्रब चेहऱ्यावर ठेऊन त्यानंतर ते गार पाण्याने धुवा. यामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत होते.

मध आणि संत्र्याचे स्क्रब

मध आणि संत्री या दोन्ही गोष्टी चेहऱ्यासाठी अतिशय चांगल्या असतात. दोन चमचे संत्र्याची पावडर आणि ओटस मधामध्ये योग्य पद्धतीने एकत्र करा. याची जाड पेस्ट होईपर्यंत ते नीट एकत्र करा. नंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. पाच ते सात मिनिटांनी गार पाण्याने चेहरा धुवा.

ओटस आणि टोमॅटो स्क्रब

या स्क्रबरसाठी ओटस, पीठीसाखर आणि टोमॅटो या पदार्थांची आवश्यकता असते. हे पदार्थ एकत्र करुन त्यांची बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला नीट लावा आणि ३ ते ४ मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 11:00 am

Web Title: how to prepare scrub at home within few minutes
Next Stories
1 लहान मुलांना रमवा या रंजक खेळात
2 ताण दूर करण्यासाठी ‘हे’ चार उपाय करून पाहा
3 ‘हे’ आहेत एअरटेलचे नवीन आकर्षक प्लॅन्स
Just Now!
X