19 September 2020

News Flash

चुकून डिलीट झालेला WhatsApp मेसेज पुन्हा कसा मिळवायचा?

अनेकदा आपण चुकून एखादा महत्त्वाचा मेसेज डिलीट करतो

जगातील सर्वाधिक लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप WhatsApp चा वापर आपण सगळेच करतो. कंपनी आपल्या युजर्सच्या सोयीसाठी नव-नवे फीचर्स आणत असते. पण अनेकदा या फीचर्सचा वापर कसा करायचा याबाबत आपल्यालाच माहिती नसते. असंच एक फीचर म्हणजे डिलीट मेसेज फीचर. अनेकदा आपण चुकून एखादा महत्त्वाचा मेसेज डिलीट करतो आणि नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. येथे आम्ही तुम्हाला डिलीट केलेला मेसेज कसा Recover करायचा यासाठी काही सोप्या टीप्स सांगणार आहोत. पण, जर हा मेसेज बॅकअप घेतल्यानंतर आला असेल तर रिकव्हर करता येणार नाही हे लक्षात ठेवा.

कसा रिकव्हर करायचा डिलीट मेसेज –
1.लोकल स्टोरेजसाठी
ही पद्धत केवळ अँड्रॉइड युजर्ससाठी काम करते, iOS युजर्ससाठी नाही.
सर्वप्रथम फोनमध्ये फाइल मॅनेजर ओपन करा
येथे WhatsApp फोल्डरमध्ये जाऊन Database वर क्लिक करा
या फोल्डरमध्ये WhatsApp च्या सर्व बॅकअप फाइल असतात.
msgstore.db.crypt12 नावाच्या फाइलवर थोड्यावेळ प्रेस करा आणि नाव एडिट करा.
नवीन नाव msgstore_backup.db.crypt12 असं ठेवा. नवीन फाइल रिप्लेस होऊ नये यासाठी आपण नाव बदलावं.
आता सर्वात लेटेस्ट बॅकअप फाइलचं नाव msgstore.db.crypt12 असं ठेवा
आता गुगल ड्राइव्हमध्ये जा आणि आपले WhatsApp बॅकअप डिलीट करा
आता WhatsApp अनइंस्टॉल करा आणि परत इंस्टॉल करा
पुन्हा WhatsApp सुरू केल्यानंतर लोकल स्टोरेज बॅकअपसाठी तुम्हाला विचारलं जाईल.
येथे msgstore.db.crypt12 फाइल सिलेक्ट केल्यानंतर Restore वर टॅप करा
आता तुम्हाला तुमचा मेसेज मिळेल.

2. Google Drive किंवा iCloud
ही पद्धत आयफोन आणि अँड्रॉइड दोन्ही युजर्स करु शकतात.
स्मार्टफोनमधून WhatsApp अनइंस्टॉल करा आणि पुन्हा इंस्टॉल करा
पुन्हा WhatsApp सुरू झाल्यानंतर तुम्हाला गुगल ड्राइव किंवा iCloud कडून बॅकअप मागितला जाईल.
बॅकअप रिस्टोर करा
सगळ्या चॅटिंगसह तुमचा मेसेजही परत येईल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2020 10:43 am

Web Title: how to recover deleted messages on whatsapp sas 89
Next Stories
1 नवीन Suzuki Access स्कुटी लाँच, ‘ही’ आहे किंमत
2 सरकारचा नवा नियम; आता 16 नव्हे, तर 24 डिग्रीवर चालणार तुमच्या घरातील AC
3 पुरुषांपेक्षा जास्त साखर खातात महिला
Just Now!
X