News Flash

मोबाईलमध्ये एकच नंबर अनेकदा सेव्ह झालाय? असे करा डिलीट

सोप्या ४ पायऱ्या

आपण नवीन फोन खरेदी केल्यावर आधीच्या फोनमधील सगळे कॉन्टॅक्टस नवीन फोनमध्ये घेणे हे एक अतिशय महत्त्वाचे काम असते. अनेकदा एखादा नवीन कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह करताना आपण त्यातील पर्याय योग्य पद्धतीने वाचत नाही आणि एकच क्रमांक ४ वेळा सेव्ह होतो. हे कॉन्टॅक्ट एका फोनमधून दुसऱ्या फोनमध्ये घेतानाही ते एकाहून जास्त वेळा कॉपी होतात. त्यामुळे हळूहळू फोन स्लो होतो.

याबरोबरच फोनमध्ये आपल्याला एखादा कॉन्टॅक्ट शोधायचा असेल तरीही आपल्याला बरेच स्क्रोल करावे लागते. याचे कारण म्हणजे एकच कॉन्टॅक्ट नंबर ३ ते ४ वेळा सेव्ह झालेला असतो. आता हे पुन्हा पुन्हा सेव्ह झालेले कॉन्टॅक्टस एक एक करुन डिलीट करायचे म्हटले तर त्यामध्ये खूप जास्त वेळ जातो. मात्र,काही सोप्या पद्धती वापरल्यास आपल्याला हे कॉन्टॅक्ट झटकन डिलीट करता येतात. पाहूयात यासाठीच्या काही सोप्या स्टेप्स.

१. आपल्या फोनमध्ये गुगल प्ले स्टोअरमधून Duplicate Contacts Remover (डुप्लिकेट कॉन्टॅक्ट रिमूव्हर) हे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा.

२. अॅप्लिकेशन इन्स्टॉल केल्यानंतर ते ओपन करा. त्यानंतर त्यामध्ये पर्याय येईल त्याला अलाऊ करा. तसे न केल्यास कॉन्टॅक्ट डिलीट होणार नाहीत.

३. अॅप ओपन केल्यानंतर आपल्या फोनमधील सगळे डुप्लिकेट कॉनन्टॅक्ट स्कॅन केले जातील.

४. त्यानंतर तुम्हाला डिलीट या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यामुळे फोनमधील सगळे डुप्लिकेट कॉन्टॅक्ट डिलीट होतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2017 11:52 am

Web Title: how to remove duplicate contacts from phone in 4 easy steps
Next Stories
1 पिंपल्स येऊ नयेत म्हणून ‘हे’ पदार्थ टाळा
2 शिओमीच्या छायाचित्र स्पर्धेत मिळणार १९ लाखांहून अधिक बक्षिस
3 मेंदूच्या आरोग्यासाठी एरोबिक व्यायाम उपयुक्त
Just Now!
X