सध्याच्या डिजिटल काळात लहान मुलं सतत स्मार्टफोनद्वारे ऑनलाइन विश्वात रमलेली पहायला मिळतात. मोबाइलच्या माध्यमातून ऑनलाइन विश्वातील अनेक गैरप्रकारांना ते बळी पडतात. आत्महत्या करण्यापासून ते सायबर बुलिंगसारख्या अनेक प्रकारांना मुलं बळी पडल्याचं आपण वाचतो. अशावेळी पालकांनी बघ्याची भूमिका घ्यायची की मुलांच्या विश्वात काय चाललंय हे स्वत: डोकावून बघायचं…अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ‘सोशल Kid’a’ या विशेष सीरिजच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. ‘गोष्ट बालमनाची’ मध्ये समाजमाध्यमांच्या अभ्यासिका मुक्ता चैतन्य मार्गदर्शन करत आहेत.

अशा अनेक बालमनाशी निगडीत गोष्टींचा उहापोह आपण या सीरिजच्या माध्यमातून करणार आहोत.