पालक होणे ही उत्साहवर्धक बाब असते, पण सोबतच तुमच्यावर अनेक जबाबदाऱ्या येऊन पडतात. ज्यांपैकी आर्थिक पाठबळ हा अनेक आव्हानात्मक पैलुंपैकी एक पैलु असतो. तुम्ही तुमच्या ध्येयांच्या दिशेने काम करणे आणि तुमच्या लहानग्याच्या आर्थिक सुरक्षिततेची हमी मिळवण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था लावणे आवश्यक असते. याचा अर्थ तुमच्या खर्चांमध्ये कपात करणे आणि तुमच्या मुलाच्या आर्थिक सुरक्षेला आणि हिताला साजेशा वित्तीय उत्पादनांची भर घालणे. तुमच्या मुलाने त्याच्या पसंतीचे करिअर निवडताना किंवा त्याच्या आयुष्यातील कोणत्याही महत्त्वाच्या क्षणी, केवळ तुम्ही योग्य वेळी योग्य ती आर्थिक सोय करून ठेवली नाही म्हणून तडजोड केलेली तुम्हाला चालणार नाही. त्यामुळे तुम्ही कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात ते पाहूया.

आयुर्विम्याचा आढावा घ्या

तुमचे आयुर्विमा संरक्षण, वाढत्या आर्थिक जबाबदाऱ्यांसह वेळोवेळी अद्ययावत करणे आवश्यक असते. यामागे तुमच्यावर अवलंबून असणारे लोक तुमचा अकाली मृत्यु झाल्यास आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहावेत ही भावना असते. तुमचे मूल वाढत असताना, तुमचे खर्च, ध्येये, कर्जे, वाढतच जाणार आहेत आणि तुमचे उत्पन्नसुद्धा वाढणार आहे. म्हणून, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर अपयश आल्यास आधार म्हणून तुमच्या मुलाकडे निधी असेल आणि तुमच्या अनुपस्थितीत ते मूल तुमची कर्जे फेडू शकेल व मूलभूत गरजांची पूर्तता करू शकेल याची खातरजमा करून घ्या.

आरोग्य विम्यामध्ये तुमच्या मुलांचा समावेश करून घ्या

तुमच्याकडे कौटुंबिक आरोग्य विमा पॉलिसी असेल, तर तुमच्याकडे असलेल्या विद्यमान पॉलिसीमध्ये तुमच्या नवजात अर्भकास समाविष्ट करून घेण्याचा पर्याय असतो. यासाठी विमा कंपनीला बाळाच्या जन्माची माहिती द्यायची असते, आणि कोणताही अतिरिक्त प्रिमियम भरावा लागत नाही. बहुतेक विमेदार कंपन्या बाळासाठी पहिल्या वर्षात मोफत आरोग्य सुरक्षा देऊ करतात. तुम्ही तुमच्या बाळास ते वयाची २५ वर्षे पूर्ण करेपर्यंत विमेकृत ठेवण्याची खात्री करा, ज्यानंतर ते स्वत:साठी वेगळी पॉलिसी खरेदी करू शकते. जर पॉलिसी लहान वयात काढली असेल, तर त्यासाठी आरोग्याची कोणत्याही प्रकारची पूर्वतपासणी करावी लागत नाही आणि सर्व आजारांपासून सहज संरक्षण मिळते. तसेच, प्रतीक्षा कालावधीसुद्धा नसतो.

आपातकालीन निधी तयार ठेवणे

नोकरी जाणे किंवा अचानकपणे आरोग्यावर संकट ओढावणे अशांसारख्या आर्थिक ताण आणणाऱ्या परिस्थितींवर मात करण्यासाठी तुमच्याजवळ निधी असायला हवा. या परिस्थितींमुळे लोक कृतीपासून खूप काळ दुरावू शकतात, ज्यामुळे पैशाची टंचाई उद्भवू शकते. अशा वेळी, आपातकालीन निधीमुळे तुमची बिले, भाडे, शिक्षण शुल्क, यांचा भरणा होऊन तुमच्या बचतींवर ताण पडत नाही आणि तुम्ही कर्जबाजारी होण्यापासून वाचता. या हेतुसाठी रिकरिंग डिपॉझिट्स (आरडी) आणि फिक्स्ड डिपॉझिट्स ही गुंतवणुकीची आदर्श साधने ठरू शकतात. पुरेशी बचत करण्यासाठी तुमच्या महिन्याभराच्या खर्चाच्या ६ ते १२ पट रकमेएवढा निधी साठवण्याचे लक्ष्य ठेवा.

महागाईवर मात करू शकतील अशा गोष्टींमध्ये गुंतवणूक करा

तुम्ही बचत करण्यासाठी जीवापाड मेहनत घेत असाल पण जर तुम्ही तुमचे सारे पैसे एका अशा गुंतवणूक साधनात ठेवलेत जे महागाईवर मात करण्यास सक्षम नसेल, तर तुम्ही मोबदला पाहून निराशच व्हाल. महागाई सतत वाढत असते, ज्यामुळे पैशाचे मूल्य कालौघात कमी होत असते. याचा अर्थ असा की भविष्यात शिक्षण हे अधिकाधिक महाग होत जाणार आहे आणि त्याचबरोबर आरोग्य सेवा आणि इतर सर्व काही महाग होणार आहे. म्हणून तुम्ही तुमच्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी किंवा भावी गरजांसाठी बचत करत असाल, तेव्हा तुमचे पैसे एका अशा फंडामध्ये ठेवा जो भविष्यात चांगली वृद्धी देऊ करेल, उदा. म्युच्युअल फंड आणि महागाईशी जुळवून घेणाऱ्या निधीचे लक्ष्य बाळगा.

कर्जाचे ओझे कमी ठेवा

तुमचे मूल मोठे झाल्यावर तुम्हाला त्याच्यावर कर्जाचा वारसा लादायचा नसतो. त्यामुळे फक्त त्यांच्या आर्थिक स्थितीवर ओझे येणार असते. म्हणूनच, अनावश्यक कर्जे घेऊन आणि तुम्ही फेडू न शकलेली कर्जे मागे ठेवून जाऊ नका. तुम्ही घेतलेले प्रत्येक कर्ज फेडण्याची तुमच्याकडे योजना असेल आणि तुम्ही वेळेत ते कर्ज फेडू शकाल याची खातरजमा करून घ्या.

आदिल शेट्टी

सीईओ, बँकबाझार