फेसबुक-केंब्रिज ऐनालिटिका डेटा लीक प्रकरणानंतर आता इंटरनेट वापरकर्ते सतर्क झाले आहेत. किती आणि कोणत्या प्रकारची माहिती इंटरनेटवर शेअर करायला हवी याबाबत आता चर्चा होताना दिसत आहेत. यापूर्वी दुर्लक्ष करणारे युजर्स देखील आता जागरुक झाले आहेत.काही दिवसांपूर्वी फेसबुकचीच मालकी असलेल्या व्हॉट्सअॅपवर देखील फेसबुकच्या युजर्सचा डेटा शेअर करण्याचे आरोप झाले. त्यावर, आम्ही युजर्सकडून खूप कमी डेटा घेत असतो, आणि प्रत्येक मेसेज हा एंड-टू-एंड इन्क्रिप्टेड असतो असं स्पष्टीकरण व्हॉट्सअॅपने दिलं.

मात्र, व्हॉट्सअॅप वापरताना डेटा फेसबुकवर शेअर करावा की नाही याचा पर्याय युजर्सकडे असतो. खालील दोन पर्यायांद्वारे तुम्ही व्हॉट्सअॅपला फेसबुकसोबत डेटा शेअर करण्यापासून रोखू शकतात.

ऑप्शन १: तुम्ही व्हॉट्सअॅप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अपडेटेड टर्म्स ऑफ सर्विस अॅन्ड प्रायवसी पॉलिसीला ‘अॅग्री’ करण्यास सांगितलं जाईल. पण याला अॅग्री करण्याआधी ‘रीड मोर’ या पर्यायावर टॅप करा. त्यानंतर स्क्रीनवर सर्वात खाली एक कंट्रोलचं बटन दिसेल, त्यामध्ये तुम्हाला जी माहिती फेसबुकसोबत शेअर करायची नसेल त्याला अनचेक करा.

ऑप्शन २: जर तुम्ही आधीच व्हॉट्सअपच्या टर्म्स आणि पॉलिसी ‘अॅग्री’ केलं असेल पण आता तुम्हाला त्यात बदल करायचा आहे, तर तुम्ही या दुस-या पर्यायाचा वापर करु शकतात. पण हा पर्याय केवळ ३० दिवसांसाठीच वापरता येतो. सेटिंगमध्ये जाऊन अकाउंटवर जा, त्यानंतर शेअर माय अकाउँट इन्फोवर टॅप करा. तुम्हाला अकाउंटची माहिती फेसबुकसोबत शेअर करायची नसेल तर अनचेक करा.