08 December 2019

News Flash

असे राखा कुरळ्या केसांचे सौंदर्य

सध्या कुरळे केस म्हणजे स्टाइल स्टेटमेंट मानलं जातं

आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे केस. या केसांमध्येही अनेक प्रकार आहेत. काहींचे केस हे सरळ असतात. तर काहींचे केस हे कुरळे असतात. सध्या कुरळे केस म्हणजे स्टाइल स्टेटमेंट मानलं जातं. जर कुरळे असतील तर त्यांच्या वेगवेगळ्या स्टाइल्स करता येतात. पण कुरळ्या केसांची नीट निगा राखणंही तितकंच गरजेचं असतं. कुरळ्या केसांच्या कुरळेपणाचेही वेगवेगळे प्रकार असतात. वेवी हेअर, मोठे कर्ल, मध्यम कर्ल व लहान कर्ल आणि त्यानुसार त्यांची निगा राखली गेली पाहिजे.

१. योग्य शाम्पूचा वापर –
कुरळ्या केसांसाठी सल्फेट-फ्री शाम्पू वापरावा आणि मग त्याला कंडिशिनिंग करावं. कंडिशनर वापरताना स्काल्पवर ते लावलं जाणार नाही याची काळजी घ्यावी. ज्या वेळी तुम्ही हेअर वॉश घेणार आहात तेव्हाच बाथरूममध्ये केसांचा गुंता काढून घ्या किंवा एक दिवस आधी व्यवस्थित तेल लावून गुंता काढा. त्यासाठी मोठय़ा दाताचा कंगवा वापरा

२. सिरम लावणे –
पावसाळा आणि हिवाळा या ऋतुंमध्ये केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यामुळे अशा काळामध्ये अॅटी-ऑक्सिडेंट क्रीम, सीरम किंवा कंडिशनर लावावे. नियमितपणे केसांची काळजी घेतली आणि सिरम लावलं तर केस शुष्क होत नाहीत.

३. नियमित तेल लावणे –
आजकालच्या अनेक मुली केसांना तेल लावण्याचं टाळतात. केस चिकट होतात किंवा केसांचं तेल लवकर निघत नाही, अशा अनेक कारणांमुळे मुली तेल लावत नाहीत. परंतु केसांना तेलाची अत्यंत आवश्यकता असते. केस वाढीसाठी तेल हे महत्त्वाचं आहे. खासकरुन ज्यांचे केस कुरळे आहेत अशा मुलींनी तर नियमित तेल लावावं. बदाम किंवा खोबऱ्याच्या तेलाने आठवड्यातून तीन वेळा केसांना मालिश करावी.

४. केस वाळविणे –
केस वाळवताना ड्रायर किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर न करता त्यांना आपोआप वाळू द्यावं. आपला जुना कॉटन किंवा होजिअरी टीशर्ट केस पुसण्यासाठी खूपच उत्तम. केस पुसताना खालून वर टॉवेलमध्ये घेऊन कोरडे करून घ्यावेत. त्यामुळे केसांचा कुरळेपणा जाणार नाही आणि वाळल्यावर ते पिंजारलेले दिसणार नाहीत. मुळातच कुरळे केस सरळ केसांच्या तुलनेत रूक्ष असतात. त्यामुळे खूप स्ट्रेटिनिंग किंवा आयिनिंग करून केस स्टाइल करू नयेत त्यांना उष्णतेपासून जास्तीत जास्त लांब ठेवावं. कुरळे केस रंगीत बिट्स तसंच वेगवेगळ्या क्लिप्स, बो किंवा फुलं वापरून मस्त स्टाइल करता येतात. कुरळ्या केसांना कलर स्ट्रिक्स खूपच छान दिसतात. प्रसंगानुसार तुम्ही तुम्हाला हव्या त्या पद्धतीने ते स्टाइल करू शकता.

आणखी वाचा : ‘वाट’ लावणारा ‘वात’ ! सांधेदुखी दूर ठेवण्यासाठी…

५. केसांची निगा राखणे –
केसांची काळजी घेणे, निगा राखणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पावसाच्या पाण्यात केस भिजल्यानंतर कोमट पाण्याने केस स्वच्छ धुवावेत. त्यामुळे केस चिकट होत नाहीत. आठवड्यातून एकदा केस धुवावेत. त्यासाठी उत्तम प्रतीचा शाम्पू वापरावा.

First Published on October 9, 2019 12:22 pm

Web Title: how to take care of curly hair ssj 93
Just Now!
X