News Flash

सेल्फ सर्व्हिस : छत्रीची निगा

छत्रीची निगा राखणे खूपच महत्त्वाचे आहे.

पावसाळा आला की हमखास आठवते छत्री. पावसापासून रक्षण करण्यासाठी छत्री हे महत्त्वाचे साधन आहे. मात्र जोरदार पावसात, सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे अनेकदा छत्रीमध्ये बिघाड होतो. त्यामुळे छत्रीची निगा राखणे खूपच महत्त्वाचे आहे.

  • छत्री विकत घेताना सोय आणि टिकाऊपणा या दोन गोष्टी लक्षात घेऊनच छत्री निवडा. बाजारात असलेल्या स्वस्त दरातील, मात्र टिकाऊ नसलेली छत्री विकत घेऊ नका. प्लास्टिकच्या तारा असलेली छत्री विकत घेऊ नका.
  • पावसातून घरात किंवा कार्यालयात आल्यानंतर ओली छत्री लगेच बंद करू नका. छत्री उघडून ती सुकण्यासाठी ठेवावी. छत्री पूर्णपणे सुकल्यानंतरच ती बंद करावी.
  • ओली छत्री बंद केल्यास तिच्या काडय़ा गंजतात किंवा कापड खराब होते. त्यामुळे छत्री बंद करण्यापूर्वी सुकवणे गरजेचे आहे.
  • जोरदार वारे वाहत असतील तर छत्री शक्यतो वाऱ्याच्या दिशेलाच ठेवावी. कारण विरुद्ध दिशेला छत्री असल्यास ती उलटी होते आणि तिच्या काडय़ा तुटल्या जातात. काही वेळा कापडही तारांपासून वेगळे होते.
  • छत्रीची तार तुटली असेल किंवा तार कापडापासून विलग झाली असेल तर तात्काळ ती दुरुस्त करून घ्या. अशा प्रकारच्या छत्रीकडे दुर्लक्ष केल्यास ती पुढे निरुपयोगी होऊ शकते.
  • छत्री नेहमी हळूच उघडावी. झटकन छत्री उघडल्यास तिची तार तुटण्याची शक्यता असते.
  • छत्री उघडत नसेल तर बटणावर अधिक जोर देऊ नका. छत्री दुरुस्त करून तिचे बटन बदलून घ्यावे.
  • छत्रीचा केवळ पाऊस आणि उन्हापासून संरक्षण करण्यासाठीच उपयोग करा. वस्तू वाहणे, चालण्यासाठी काठी किंवा इतर उपयोग करू नका. तीव्र उन्हातही छत्री वापरू नये.
  • प्रवासात अनेकदा छत्रीची मूठ कोणत्याही टणक वस्तूला आपटली जाते. त्यामुळे मूठ तुटण्याचा धोका असतो. त्यामुळे प्रवासात छत्रीची काळजी घ्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2018 12:50 am

Web Title: how to take care of umbrella
Next Stories
1 ताणमुक्तीची तान : नृत्याची साधना हीच ताणमुक्ती
2 न्यारी न्याहारी : झटपट टोमॅटो डोसा
3 फेकन्युज : अशोक गेहलोत तसे म्हणाले नव्हते
Just Now!
X