संगणक संचामध्ये कळफलक (की-बोर्ड) हे एक महत्त्वाचे उपकरण आहे. कळफलकाच्या साहाय्यानेच संगणकीय काम करता येते. त्यामुळे कळफलकाची देखभाल वेळोवेळी घेणे आवश्यक आहे.

  • शक्यतो संगणक बंद असतानाच कळफलकाची स्वच्छता करा. कळफलक संगणकापासून वेगळा करून त्याची साफसफाई केल्यास अधिक चांगले.
  • कळफलक संगणकापासून वेगळा केल्यानंतर तो जमिनीवर उपडा ठेवा. म्हणजे त्यावरील धूळ, दोन कळमध्ये अडकलेला कचरा खाली पडेल.
  • शक्यतो एखादा पदार्थ खाताना संगणकीय काम करू नका. नाहीतर कळफलकावरील कळ तेलकट होण्याची शक्यता असते. काही पदार्थ कळफलकाच्या कळमध्ये अडकण्याची शक्यता असते.
  • कळफलक साफ करण्यासाठी टूथब्रश किंवा मऊ केसांच्या लहान झाडूचा वापर करा.
  • ‘काँप्रेस्ड एअर’च्या साहाय्याने कळफलक साफ करू शकता.
  • ओल्या फडक्याने कळफलकावरील कळ पुसून घ्या. मात्र अधिक ओलसर कपडा वापरू नका. ओल्या कपडय़ाने कळफलक पुसल्यानंतर लगेच त्याची जोडणी संगणकाला करू नका.
  • सुक्या सुती कापडाने किंवा पेपर टॉवेलने संगणकाचा कळफलक पुसू शकता.
  • कळफलक पुसताना कोणत्याही रासायनिक पदार्थाचा वापर करू नका.
  • जर कळफलकावर एखादा द्रवपदार्थ सांडला असेल, तर तात्काळ संगणक शटडाऊन करा. कळफलक संगणकापासून वेगळा करा आणि या द्रव पदार्थाची साफसफाई करावी. सुकल्यानंतरच कळफलक संगणकाला जोडावा.

A girl told the incident of how she got Rs 2 back while buying a ticket in a metro station
तिकीटातील २ रुपये परत केले नाही म्हणून तरुणीने लढवली शक्कल, पुणे मेट्रो स्टेशनवरील व्हिडीओ व्हायरल
Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
How To Use Quick Share feature on Android to quickly send files without an active internet connection
दोन फोनमध्ये करा Quick Share; ॲप अन् इंटरनेटचीही गरज नाही, फॉलो करा ‘या’ स्टेप्स
my portfolio, small cap fund
‘माझा पोर्टफोलियो’ : स्मॉल आणि मिडकॅपमधील अस्थिरतेची झळ, पहिला त्रैमासिक आढावा- २०२४