News Flash

थंडीत ‘अशी’ घ्या टाचांची काळजी

घरगुती टिप्स

थंडीत ‘अशी’ घ्या टाचांची काळजी

थंडी आली की त्वचा कोरडे पडायला लागते. मग शरीराला खाज सुटण, ओठांची त्वचा निघणे असे व्हायला लागते. मात्र हे नीट दिसावे यासाठी आपण अनेक वेगवेगळे उपाय करतो. कधी मॉईश्चरायझर लावणे तर कधी खोबरेल तेलाने मालीश करणे असे उपाय केले जातात. पण चेहऱ्याच्या त्वचेबरोबरच पायांची विशेषत: टाचेच्या त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. टाचांना पडणाऱ्या भेगा कालांतराने इतक्या वाढतात की त्यातून काही गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. पण घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास या भेगांपासून आपली निश्चितच सुटका होऊ शकते. पाहूयात काय आहेत हे उपाय….

– पायांच्या तळव्यांना कायम स्क्रब करा. त्यामुळे पावलांवरची धुळ निघून जाण्यास मदत होईल. पायांची त्वचाही गुळगुळीत होण्यास याचा चांगला फायदा होईल.

– थंडीत रात्री झोपण्याआधी आपण चेहऱ्याला मॉईश्चरायझर लावतो. त्याचप्रमाणे पायालाही मॉईश्चराईज करायची सवय ठेवा. त्यामुळे पायांची त्वचा मुलायम राहण्यास मदत होईल.

– ऑलिव्ह ऑइल हे त्वचेसाठी अतिशय चांगले असते. त्यामुळे थंडीत टाचांना पडणाऱ्या भेगांसाठी त्याचा निश्चितच चांगला उपयोग होतो.

– यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पायंना भेगा पडल्यानंतर त्यामध्ये घाण साचते. विशेषत: महिला दिवसभर विविध कामे करत असतात. त्यांच्या पायांच्या भेगांमध्ये घाण साचण्याचे प्रमाण जास्त असते. असे होऊ नये यासाठी तुमच्या टाचांना भेगा असतील तर पाय वारंवार पाण्याने धुत राहा. म्हणजे घाण गेली तरी ती वेळच्या वेळी साफ होईल.

– ग्लिसरीन आणि गुलाबपाणी यांचे मिश्रण भेगांना लावा. १० मिनिटे लावून ठेवल्यानंतर पाय धुवून टाका. यामुळे पायाची त्वचा मऊ होण्यास मदत होईल. याबरोबरच आठवड्यातून एकदातरी पायाला स्क्रब करायला विसरु नका. यासाठी तांदळाच्या पीठाचा वापर करा.

 

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 11, 2017 9:00 am

Web Title: how to take care of your feet in winter season easy tips
Next Stories
1 शीत कटिबंधात राहणाऱ्यांना कर्करोगाचा धोका अधिक
2 टोयोटाच्या या ऑफर्स माहितीयेत? 
3 ‘ही’ आहेत रक्तदाबाची सुरुवातीची लक्षणे
Just Now!
X