News Flash

सावधान! आता स्मार्टफोनही ठेवणार तुमच्यावर नजर

आता स्मार्टफोन वापरणाऱ्या जवळजवळ प्रत्येकाला सीसीटीव्हीचा वापर करणे शक्य होणार आहे.

घरात होणारी चोरी रोखण्यासाठी आपण दरवाजावर कितीही उत्तम दर्जाची सुरक्षा यंत्रणा लावली तरी घराबाहेर पडताना घराची काळजी असतेच. मग यावर उपाय म्हणुन बऱ्याचदा आपण घरापासुन दूर राहणे शक्यतो टाळतो. परंतु आता अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीने घरापासून लांब असतानाही आपण २४ तास घरात होणाऱ्या हालचालींवर नजर ठेवू शकतो. यासाठी सध्या सीसीटीव्ही या लोकप्रिय तंत्रज्ञानाचा सर्वात जास्त वापर करण्यात येत आहे. परंतु या तंत्रज्ञानाची योग्य देखभाल करणे आर्थिकदृष्ट्या प्रत्येकाला शक्य होईलच असे नाही. त्यामुळे अनेक जण या तंत्रज्ञानाचा वापर टाळतात. परंतु आता स्मार्टफोन वापरणाऱ्या जवळजवळ प्रत्येकाला सीसीटीव्हीचा वापर करणे शक्य होणार आहे.

कसा करायचा वापर ?

दोन स्मार्टफोन घेउन त्यात Presence, iCamSpy, Alfred, iCamViewer, CCTV Camera Pros Mobile यांपैकी कोणतेही एक अॅप डाऊनलोड करा. हे होम सिक्युरिटी अॅप्स अँड्रॉइड व आयओएस दोन्ही युजरसाठी उपलब्ध आहेत. त्यामध्ये आपली वैयक्तीक माहिती भरुन लॉग इन करा. नंतर दोन्ही अॅप्सना ओपन करुन एकमेकांशी कनेक्ट करा. त्यानंतर घरात ठेवलेल्या फोनमध्ये इंटरनेटच्या मदतीने लाइव्ह व्हिडीओ स्ट्रिमिंग सुरु करा, आणि तो फोन अशा एखाद्या कोपऱ्यात ठेवा जिथून संपुर्ण घरावर नजर ठेवता येऊ शकते.

एकदा लाइव्ह स्ट्रिमिंग सुरु झाले की, डाऊनलोड केलेल्या अॅपच्या मदतीने आपल्याला घरात नसतानाही घरात काय सुरु आहे हे पाहता येऊ शकते. हे अॅप अगदी फेसबुक लाइव्ह प्रमाणेच काम करते. परंतु फेसबुक लाइव्हमध्ये ब्रॉडकास्ट होणारा व्हिडीओ आपल्या सर्व फेसबुकवरील मित्रमंडळींना दिसतो. परंतु Presence, iCamSpy, Alfred, iCamViewer, CCTV Camera Pros Mobile यापैकी एका अॅप्सच्या मदतीने केले जाणारे लाइव्ह स्ट्रिमिंग आपल्याच मोबाइलमध्ये दिसते.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जो फोन आपण घरात ठेवणार आहोत त्या फोनचा कॅमेरा व आवाज रेकॉर्ड करण्याची क्षमता उत्तम दर्जाची असेल याची काळजी घ्या, जेणेकरुन आपल्याला चांगल्या दर्जाचे फुटेज मिळू शकेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2018 7:52 pm

Web Title: how to turn your old smartphone into a cctv camera
Next Stories
1 अजब ! या पार्लरमध्ये सोन्याच्या वस्तऱ्याने करतात दाढी 
2 वाहतूक कोंडीत अडकलेल्या नवरदेवावर आली रस्त्याने चालत जाऊन बोहल्यावर चढण्याची वेळ
3 होंडाची नेक्स्ट जनरेशन Amaze लॉन्च , मारुती डिझायरला देणार टक्कर
Just Now!
X