करोना व्हायरसमुळे लॉकडाउन असल्याने घरबसल्या व्हिडिओ कॉलिंग फीचर असलेल्या अ‍ॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. मित्र, नातेवाईक किंवा सहकारी यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी व्हिडीओ कॉलिंग हा आपल्या जिवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. लोकांची हीच गरज ओळखून गुगल कंपनीने काही दिवसांपूर्वीच Google Meet सर्व युजर्ससाठी मोफत उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. यात आता एकाच वेळी ४९ लोकांना व्हिडीओ कॉल करता येण्याची सुविधा दिली आहे. म्हणजे एकाच वेळी तुमच्या स्क्रीनवर ४९ जण दिसतील. एकाचवेळी ४९ जण दिसावेत यासाठी व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग टूल गूगल मीटमध्ये खास पोर्ट जारी करण्यात आला आहे.

हा सपोर्ट बाय डिफॉल्ट डिजेबल्ड आहे. त्यामुळे तुम्हाला मॅन्युअली जाऊन अनेबल करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला काही स्टेप माहित असणे गरजेचं आहे. त्याच स्टोप आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

– apps.google.com/meet/ याच्या मदतीने गूगल मीट ओपन करा.

– गरजेनुसार Join a meeting किंवा Start a meeting हा पर्याय निवडा.

– मीटिंग रूममध्ये आल्यानंतर स्क्रीनच्या बॉटम राइट कॉर्नरला तीन हॉरिजोंटल लाइनवर क्लीक करा…

– त्यानंतर ‘चेंज लेआउट’ वर क्लीक करा.

– त्यानंतर चार पर्याय तुमच्यासमोर येतील. या चार पर्यायापैकी ‘Tiled’ लेआउट वर क्लीक करा.

– त्यानंतर टाइल्सच्या नंबरला ४९ वर सेट करण्यासाठी बॉटमपासून स्लाइडरला ड्रॅग करा आणि एक्सट्रीम राइटमध्ये घेऊन जा.

या सर्व प्रक्रियेनंतर तुमच्या स्क्रीनवर एकाचवेळी ४९ जण दिसतील. हा फिचर फक्त वेबसाठी उपलबद्ध आहे. बाय डिफॉल्ट तुम्ही ऑटो लेआउट ९ टाइल्ड लेआउटमध्ये १६ टाइल्स दिसतील. दरम्यान, यापूर्वी गुगलने आपल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप Google Meet ची फ्री सर्व्हिस 30 सप्टेंबरला संपेल, असं जाहीर केलं होतं. पण, आता कंपनीने ही फ्री सर्व्हिस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलने एका ब्लॉग पोस्टद्वारे याबाबत माहिती देताना, युजर्स Google Meet ची फ्री सर्व्हिस आता पुढील वर्षी मार्च २०२१ पर्यंत वापरु शकतात असे स्पष्ट केले आहे.