आपले घर इतरांपेक्षा वेगळे दिसावे, घराच्या सजावटीची, नेटकेपणाची सर्वांनी नोंद घ्यावी याचा विचार आपण नेहमीच करत असतो. त्यासाठी आपण वेगवेगळे उपाय, कल्पना लढवत असतो जेणेकरुन आपल्या घराला एक निराळा, सुंदर लूक मिळावा. अशा या विचारातून विविध कल्पना येतात आणि सजावटीच्या नवनवीन गोष्टी उदयाला येतात. प्रत्येक सणाला वेगवेगळे फर्निचर किंवा रंग बदलू शकत नाही. मग घराला वेगळा आणि हटके लुक कसा द्यावा या विवंचनेत जर तुम्ही असला तर हा लेख तुम्हाला नक्कीच मदत करु शकेल.

घराचा लूक बदलण्यासाठी ‘कुशन’ हे छोटेसे पण अगदी परिणामकारक टूल आहे. उशी या गोष्टीचा झोपण्यासाठी तर उपयोग होतोच पण घराच्या सजावटीसाठीही या उशांचा हल्ली सर्रास वापर केलेला दिसतो. डिजिटल प्रिंटेड कुशन कव्हर, एम्ब्रोडरी कुशन कव्हर, फॉइल कुशन कव्हर, डक प्रिंटेडसारखे वेगवेगळे कुशन व कुशन कव्हर तुम्हाला बाजारामध्ये सहज उपलब्ध आहेत. कुशन तशी छोटीशी वस्तु आहे पण ती योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीने ठेवल्यास तिच्यामध्ये आपल्या घराचा चेहरामोहरा बदलण्याची ताक़द आहे.

सोफ्यावरील कुशन : सणांच्या दिवसांमध्ये माजघरातील सोफ्यावर कुशनसाठी सोनेरी, पिवळसर, निळा, नारींगीं या रंगाचा वापर करा. हॉल हा घराचा चेहरा असतो त्यामुळे येथे वापरलेली वस्त्रे आणि वस्तू घरातल्या मंडळींचे स्वभाव आणि विचार यांची कल्पना देतात. कुशनच्या वापराने योग्य ती सकारात्मकता निर्माण केली जाऊ शकते. खणाच्या कापडाचा वापर करूनसुद्धा तुम्ही माजघराला वेगळा पारंपारीक लुक देऊ शकता. तुमच्या सोफ्याच्या किंवा बैठकीचा आकार बघून तुमच्या कुशनचा आकार ठरवा.

लहान मुलांच्या रूममधील कुशन : लहान मुलांच्या रूममधील वातावरण नेहमीच हसत खेळत राहायला हवे. यासाठी घरातील भिंतीवरील रंगाबरोबरच लहान मुलांच्या रूममधील कुशनकडेही लक्ष द्या. आजकाल बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स, टेडी, प्राणी यांच्या आकारांचे कुशन सहज उपलब्ध होतात. या कुशनच्या वापराने रूम तर शुशोभित होतेच, रूम मधील वातावरण हलके-फुलके आणि खेळकर राहण्यास मदत होते. लहान मुलांना रंगीबेरंगी गोष्टी आवडत असल्याने त्यांना या खोलीत जास्त आवडते.

बेडरूममधील पिलो : बेडरूम ही आराम करण्यची जागा असते. दिवसभराच्या धकाधकीतून आपण काही क्षण निवांत घालविण्यासाठी याठिकाणी येतो. त्यामुळे या रूममध्ये साध्या सिंपल पिलो ठेवणे केव्हाही चांगले असते. त्यामुळे रूममधील साधेपणा तर टिकून राहिलंच आणि तुम्हाला फ्रेशही वाटेल. सध्या बाजारात वेगवेगळया फ़ीलच्या आणि आकाराच्या उशा उपलब्ध आहेत. सर्वाँनाच काही नरम उशा आवड़त नाहीत अशावेळी आपल्या आवडीच्या फ़ीलची उशी आपली उत्तम मित्र बनुन जाते.

अमित आचरेकर,

संचालक ‘वा’ कॉर्पोरेशन