मून पॅपिलोमा व्हायरस म्हणजे एचपीव्ही लशीची एक मात्राच गर्भाशय मुखाचा कर्करोग टाळण्यास पुरेशी असते असे दिसून आले आहे. प्रत्यक्षात या लशीच्या दोन किंवा तीन मात्रा देण्याची शिफारस आधीपासून करण्यात आली आहे. बूस्टन येथील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास हेल्थ स्कूलच्या सेंटर फॉर हेल्थ सव्‍‌र्हिसेस या संस्थेतील सहायक प्राध्यापक आशिष देशमुख यांनी केलेल्या संशोधनानुसार एचपीव्ही लस ही खूप प्रभावी असते व ती एचपीव्हीमुळे पुरुष व स्त्रिया यांना होणाऱ्या कर्करोगात ९० टक्के बचाव करू शकते.

अमेरिकेत ज्या स्त्रियांना या लशीची एक मात्रा देण्यात आली त्यांच्यात दोन किंवा तीन मात्रा दिलेल्या स्त्रियांइतकाच परिणाम दिसून आला. २००६ मध्ये ही लस प्रथम सुरू करण्यात आली त्यामुळे गर्भाशय मुख व मुले तसेच प्रौढांमधील कर्करोग रोखण्यास मदत होते. तोंडाचे व इतर कर्करोगावर त्याचा उपयोग होतो. अमेरिकेत ही लस देण्याचे प्रमाण पन्नास टक्के असून विकसनशील देशात ते फारच कमी म्हणजे १० टक्के आहे. कारण या लशीची किंमत ४.५० डॉलर्स आहे. ही लस लैंगिक कृतीने होणाऱ्या काही रोगांशी निगडित असल्याने त्याचा वापर करण्यास लोक आढेवेढे घेतात.

How To Avoid Food Poisoning Does Chai Goes Acidic by Heating Twice
चहा, भातासह ‘हे’ ५ पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये, कारण.. तज्ज्ञांनी सांगितलं, अन्नातून होणारी विषबाधा कशी टाळावी?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?

एचपीव्हीमुळे कर्करोग होतो हे अनेक लोकांना माहिती नाही. शिवाय त्यासाठी येणारा खर्चही जास्त आहे पण जर एका मात्रेत काम भागणार असेल तर खर्चाची मोठी अडचण येण्याचे कारण नाही असे देशमुख यांचे म्हणणे आहे. एकूण १६०० स्त्रियांचा अभ्यास केला असता त्यांच्यात या लशीमुळे चांगला परिणाम दिसून आला. अमेरिकी आरोग्य व पोषण परीक्षण पाहणीनुसार २००९ ते २०१६ या काळात ज्या महिला सहभागी होत्या त्यांच्यात दोन तृतीयांश स्त्रियांचे लसीकरण झालेले नव्हते. केवळ शंभर स्त्रियांना एकदा, १२५ स्त्रियांना दोनदा व ४००स्त्रियांना तीनदा लस देण्यात आली होती