16 October 2019

News Flash

40 मेगापिक्सेल कॅमेरा आणि बरेच काही ; हुवाईचे दोन स्मार्टफोन भारतात लाँच

वाई या स्मार्टफोन कंपनीने आपले आकर्षक P30 Pro आणि P30 Lite हे दोन फोन लाँच केले आहेत.

वाढत्या स्पर्धेत वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी प्रत्येक मोबाईल कंपन्या काहीना काही नवे घेऊन येत असतात. अशातच हुवाई या स्मार्टफोन कंपनीने आपले आकर्षक P30 Pro आणि P30 Lite हे दोन फोन लाँच केले आहेत. सध्या हे दोन्ही फोन अमेझॉन आणि क्रामा स्टोअरवर उपलब्ध आहेत. P30 Pro ची किंमत 71, 990 तर P30 Lite या फोनची किंमत 19,990 रुपये आहे.

P30 Pro मध्ये 8 GB रॅम देण्यात आली आहे. तर बॅटरी 4,200mAh ची असणार आहे. या फोनची इंटर्नल मेमरी 256GB आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 40MP आणि 20MP अल्ट्रा वाईड अँगल आहे. सेल्फी कॅमेरा तब्बल 32 MP आहे. या फोनचा डिस्प्ले 6.47 इंचाचा आहे.

P30 Lite चे फीचर्स P30 Lite फोन मध्यमवर्गीय ग्राहकांना डोळ्यासमोर ठेऊन लॉन्च करण्यात आला आहे. या फोनची रॅम 4 GB आहे. इंटर्नल मेमरी 128 GB तर डिस्प्ले 6.15 इंचाचा देण्यात आला आहे. प्रायमरी कॅमेरा 24 MP दिला आहे.

कंपनीने या दोन्ही फोनवर आकर्षक ऑफर्स दिल्या आहेत. ज्यात 18 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय आणि 5 टक्के कॅशबॅकसारख्या ऑफर्सचा समावेश आहे. या ऑफर्स फक्त अमेझॉन आणि क्रोमा स्टोअरमध्येच उपलब्ध असतील.

First Published on April 9, 2019 6:26 pm

Web Title: huawei p30 pro lounch in india