Huawei कंपनीने भारतातील आपला पहिला पॉप-अप सेल्फी कॅमेरा स्मार्टफोन Huawei Y9 Prime 2019 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन म्हणजे ‘पॉप-अप किंग’ असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. हा स्मार्टफोन 4GB रॅम+128GB स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आला आहे. 15 हजार 990 रुपये इतकी या स्मार्टफोनची किंमत आहे. भारतात सध्या असलेल्या पॉप-अप सेल्फी कॅमेरा स्मार्टफोन्सच्या किंमतीच्या तुलनेत Huawei Y9 Prime 2019 ची किंमत सर्वात कमी आहे. या स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफरअंतर्गत 1500 रुपयांची सवलत देखील मिळत आहे. तर SBI च्या कार्डवर 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. अॅमेझॉन पे द्वारे खरेदी केल्यास 500 रुपयांची सवलत देखील मिळेल.

ऑफलाइन प्री-बुकिंग केल्यास 4,598 रुपयांची उपकरणं मोफत –

या स्मार्टफोनसाठी आगाऊ नोंदणी करणाऱ्यांना Huawei Sports BT हेडफोन्स आणि तब्बल 15,600 mAh क्षमतेची पावर बँक मोफत मिळणार आहे. या दोन्ही उपकरणांची किंमत 4,598 रुपये आहे. अॅमेझॉनच्या संकेतस्थळावर 7 ऑगस्टपासून या फोनसाठी सेल आयोजित करण्यात आला आहे. हा सेल केवळ अॅमेझॉनच्या प्राइम मेंबर्ससाठीच असणार आहे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेपासून सर्वांसाठी सेलचं आयोजन करण्यात आलंय.

Huawei Y9 Prime 2019 स्मार्टफोनमध्ये 6.59 इंचाचा फुल HD+ TFT डिस्प्ले आहे. ऑक्टा-कोर HiSilicon Kirin 710 प्रोसेसर असलेल्या या स्मार्टफोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यातील प्रायमरी कॅमेरा 16 मेगापिक्सलचा तर अन्य दोन कॅमेरे 8 आणि 2 मेगापिक्सलचे आहेत. सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा आहे.
हुवावे ने Y9 Prime 2019 स्मार्टफोनमध्ये आर्टिफिशिअल इंटेलीजंस (AI) पावर्ड कॅमरा अॅप्लीकेशन देण्यात आलं आहे. या स्मार्टफोनमध्ये 4,000 mAh क्षमतेची बॅटरी असून कनेक्टिव्हिटीसाठी 4G VoLTE, Wi-Fi, ब्ल्यू-टूथ, GPS/A-GPS आणि USB टाइप-सी पोर्ट यांसारखे पर्याय आहेत.