वैवाहीक जीवन सुखी होणार की पती-पत्नीमध्ये सतत कटकटी होणार हे ठरवण्याचे महत्त्वाचे काम मानवी ‘डीएनए’वर अवलंबून असल्याचे एका नव्या अभ्यासामधून समोर आले आहे. मानवी शरीरातील  एक जनुक सीरोटोनिनचे नियमन करते. सिरोटोनिनमुळे मानवी भाव-भावनांचा नात्यावर काय परिणाम होतो ते कळते. त्यामुळे सिरोटोनिन अनुवंशीकता, भावना आणि वैवाहीक सुख यांमध्ये दुवा ठरत असल्याचा निश्कर्ष या अभ्यासातून निघाला आहे.
“एकीकडे आयुष्याच्या जोडीदारांमध्ये भाव-भावनांची देवान घेवान होते तर, दुसरीकडे एखाद्या जोडप्याचे एकमेकांशी जराही पटत नाही. असे काय आहे ते एक स्थायी गूढ आहे?,”असे कॅलिफोर्निया बरकेली विद्यापीठाचे मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट डब्ल्यू लेव्हीनसन म्हणाले.
“या अनुवांशीक शोधामुळे पती-पत्नीच्या नात्यावर प्रभाव टाकणाऱ्या व वेगवेगळ्या लोकांमध्ये भाव-भावनांना किती महत्त्व आहे हे समोर आले आहे,” असे  लेव्हीनसन पुढे म्हणाले.   
मानवी नात्यांना पूर्णत्व देण्यासाठी दुवा ठरणाऱ्या आणि जनुकीय बदल घडवणाऱ्या ‘५-एचटीटीएलपीआर’चा शोध लावण्यामध्ये संशोधकांना यश मिळाले आहे. मानसाला जनुके अनुवंशीकतेने पालकांकडून जशीच्या तशी मिळतात.