News Flash

अनेक वर्षांच्या सहवासानं नवरा-बायको एकमेकांसारखे दिसतात? – संशोधक म्हणतात

संशोधकांनी यासाठी ५१७ जोडप्यांची माहिती गोळा केली

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

बर्‍याच वर्षांपासून एकत्र राहणारे लोक एका वेळेनंतर एकमेकांसारखे दिसू लागतात? या प्रश्नाबद्दल अनेक पिढ्यापिढ्यांपासून वैज्ञानिक आणि मानससाशस्त्रज्ञ उत्सुक आहेत आणि १९८० च्या दशकाच्या सुरूवातीस यावर अभ्यास सुरू झाल्याचे संशोधन पत्रांवरून दिसून येते. अखेर या गोष्टीमागील निष्कर्षाप्रत एक नवीन संशोधन पोहचले असल्याचे दिसत आहे.

द गार्डियनच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी यावरील अभ्यासासाठी वर्षानुवर्षे जोडप्यांचे हजारो फोटो गोळा केले. संशोधकांच्या टीमने या चेहऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी अद्यावत तंत्रज्ञान देखील आणले. या अगोदर ८० च्या दशकात संशोधकांना हे काम करण्यासाठी प्रतिनिधींवर व साध्या डोळ्यांच परीक्षणावरच विसंबून राहावं लागत होतं.

स्टॅनफोर्ड विद्यापीठातील पीएचडी चा विद्यार्थी पिन पिन टी-मॅकॉर्न म्हणतो, एकमेकांसारखे दिसणाऱ्यांचा प्रश्न त्यांना अनेकदा उत्साही करत होता. जेव्हा ते चेहऱ्याच्या ठेवणीबद्दल विचार करत होते. त्यांच्या जोडीदाराबरोबर अधिक मिळतंजुळतं होण्यासाठी ते बदलही करत होते. परंतु चेहरे बदलण्याऐवजी, असे आढळून आले की, जोडीदार निवडण्यासाठी ज्यांच्या चेहऱ्याची ठेवण एकसारखी आहे अशांची निवड करण्याकडे जोडप्यांचा अधिक कल आहे.

अभ्यास काय होता? –
टी-मॅकॉर्न आणि त्याचा संशोधक सहकारी मिचेल कोसिन्स्की यांनी यासाठी पब्लिक डोमेनवरील उपलब्ध असलेल्या हजारो जोडप्यांचे फोटो चाळण्यासाठी पुढाकार घेतला. हे फोटो लग्ना अगोदरपासून ते लग्नांतर २५ वर्षांपर्यंतचे होते. संशोधकांनी अशाप्रकारे ५१७ जोडप्यांची माहिती गोळा केली.

स्टॅनफोर्ड विद्यापीठातील संशोधकांनी त्यांनतर प्रतिनिधींना एक फोटो दिला त्यासोबतच अन्य पाच चेहऱ्यांचे फोटो देखील दिले. या पाच चेहऱ्यांपैकी एक चेहरा हा त्या फोटोतील व्यक्तीचा जोडीदार होता. यानंतर संशोधकांना प्रतिनिधींना या फोटोंमध्ये असलेल्या चेहऱ्यांमधील साम्यांची नोंद घेण्यास सांगितले. त्यानंतर हेच फेशिअल रेकग्निशन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केले गेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 2:08 pm

Web Title: husbands and wives look the same after many years of companionship the researchers say msr 87
Next Stories
1 iPhone 11 पर्यंतच्या मोबाइलसोबत ना मिळणार चार्जर, ना इयरफोन
2 अ‍ॅपलकडून ‘आयफोन १२’ची घोषणा : जाणून घ्या फिचर्स आणि भारतातील किंमत
3 करोनाबाधितांसाठी फिजिओथेरपी
Just Now!
X