News Flash

10 हजारात बुकिंगला सुरूवात, जाणून घ्या कशी आहे Hyundai Aura ?

मारुती डिझायर , होंडा अमेझ यांसारख्या गाड्यांशी 'ऑरा'ची टक्कर

Hyundai कंपनीने आपली नवीन सब-कॉम्पॅक्ट सेडान कार Aura साठी बुकिंग घ्यायला सुरूवात केलीये. ही कार डिसेंबर 2019 मध्ये कंपनीने सादर केली होती, तर 21 जानेवारी रोजी कार लाँच होईल. केवळ दहा हजार रुपयांमध्ये या कारची बुकिंग सुरू झालीये. भारतीय बाजारात मारुती डिझायर आणि होंडा अमेझ यांसारख्या गाड्यांशी ऑराची टक्कर असेल.

फीचर्स काय ?
“नवीन वर्षाची सुरुवात ऑराच्या बुकिंगद्वारे झाली आहे. ऑराला चांगला प्रतिसाद मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे”, असे कंपनीचे संचालक तरुण गर्ग यांनी म्हटले आहे. या कारचे वैशिष्ट्ये म्हणजे, ही कार पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही पर्यायात उपलब्ध करण्यात येणार आहे. इंजिनचे तीन पर्याय आणि 12 व्हेरिअंट्समध्ये ऑरा उपलब्ध असेल. यातील एक इंजिन 82 bhp पावरचं 1.2 लीटर पेट्रोल, दुसरं 99 bhp पावरचं 1-लिटर टर्बो पेट्रोल आणि तिसरं 74 bhp पावरचं 1.2-लिटर डिझेल इंजिन आहे. 1.2-लिटरच्या पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल. तर, 1-लिटरच्या टर्बो पेट्रोल इंजिनसह केवळ 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल. तिन्ही इंजिन बीएस-6 मानकांसह असतील.

किंमत किती?
ऑराच्या इंटेरिअरबाबत माहिती अद्याप मिळालेली नाही, पण कॅबिन आणि फीचर्स ‘ग्रँड आय-10 नियोस’प्रमाणे असतील अशी शक्यता आहे. ऑराच्या टॉप व्हेरियंटमध्ये अँड्रॉयड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्लेसह 8 इंचाचा टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टम, 5.3 इंचाचा डिजिटल स्पीडोमीटर आणि एमआयडी, वायरलेस चार्जर, प्रीमियम साउंड सिस्टम देण्यात आला आहे. ऑराची किंमत 6 लाख ते 9 लाख रुपयांदरम्यान असण्याची शक्यता आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2020 9:22 am

Web Title: hyundai aura to come in 12 variants bookings start at rs 10000 sas 89
Next Stories
1 विक्रीची सुरूवात पुण्यातून, Bajaj Chetak इलेक्ट्रिक स्कुटर उद्या होणार लाँच
2 SBI मध्ये नोकरीची संधी, ‘क्लर्क’पदासाठी ८ हजार जागांची भरती
3 भिजवलेले बदाम आणि गर्भाची योग्य वाढ! वाचा फायदे
Just Now!
X