Hyundai Motors कंपनीने मंगळवारी(दि.9) भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात Hyundai Kona ही नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केली. Hyundai कंपनीची ही भारतातील पहिली इलेक्ट्रिक कार आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार तब्बल 452 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करु शकते, असा कंपनीचा दावा आहे. शानदार फीचर्स असलेली ही एसयूव्ही केवळ एकाच व्हेरिअंटमध्ये उतरवण्यात आलीये.

लूक –
नवीन इलेक्ट्रिक Kona दिसायला आधीपासून बाजारात असलेल्या पेट्रोल आणि डिझेल इंजिनच्या मॉडलप्रमाणेच आहे. याच्या इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये यूनीक 17-इंच अॅलॉय व्हिल्स, ऑटोमॅटिक हेडलाइट्स, एलईडी टेललाइट्स, प्लास्टिक बॉडी क्लॅडिंग आणि रूफ रेल्स आहे. भारतीय बाजारात ही एसयूव्ही व्हाईट, सिल्वर, ब्ल्यू आणि ब्लॅक अशा 4 रंगांच्या पर्यायात उपलब्ध आहे, याशिवाय व्हाईट आणि ब्लॅक रंगाचं मिश्रण असलेल्या ड्युअल टोन कलरमध्येही ही गाडी खरेदी करता येईल. मात्र यासाठी 20 हजार रुपये अधिक द्यावे लागतील.

businessman was cheated
धक्कादायक! इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचा व्हिडीओ वापरुन व्यावसायिकाची दहा लाखांची फसवणूक
Bharat Electronics Limited Trainee Engineer 517 vacancies Last Day 13 March
BEL Trainee Bharti 2024: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ट्रेनी इंजिनिअरच्या ५१७ पदांसाठी भरती! ‘या’ तारखेपूर्वी करा अर्ज
Delhi metro catches fire incident video goes viral
दिल्लीतील मेट्रो स्टेशनवरील VIDEO व्हायरल; प्रवासी प्लॅटफॉर्मवर उभे असताना घडलं भयंकर…
Indian driving license
भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससह तुम्ही ‘या’ ९ देशांमध्ये बिनधास्त वाहन चालवू शकता!

पावर –
कोना इलेक्ट्रिकमध्ये 39.2 kWh बॅटरी पॅक आहे. या बॅटरी पॅकसोबत देण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटर 136 hp ची ऊर्जा आणि 395 Nm पीक टॉर्क निर्माण करते. अवघ्या 9.7 सेकंदांमध्ये ही कार 0 से 100 किलोमीटर प्रतितासाचा वेग पकडू शकते असा कंपनीचा दावा आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार तब्बल 452 किलोमीटरपर्यंतचा प्रवास करु शकते, असाही दावा कंपनीने केला आहे.

चार्जिंग टाइम –
डीसी फास्ट चार्जरद्वारे ही एसयूव्ही अवघ्या 57 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते. Hyundai कंपनी या कारसह Home Charger देखील देणार असून ग्राहकांसाठी डिलरशीपमध्ये चार्जिंग स्टेशन्स उभारले जातील. चार मोठ्या शहरांतील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाजवळ देखील चार्जिंग स्टेशन उभारले जातील. सामान्य चार्जरने 6 तास 10 मिनिटांमध्ये ही कार पूर्ण चार्ज होते.

फीचर्स –
इलेक्ट्रिक सनरूफ, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, 10-वे पावर अॅड्जस्टेबल ड्रायव्हर सीट, फ्रंट वेंटिलेटेड आणि हीटेड सीट्स, वायरलेस फोन चार्जर, अँड्रॉईड ऑटो आणि अॅपल कार-प्लेसह 7-इंच टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टिम आणि स्टिअरिंग माउंटेड कंट्रोल्स यांसारखे अनेक फीचर्स आहेत.

सुरक्षा –
सुरक्षिततेच्या दृष्टीने या कारमध्ये कंपनीने दमदार फीचर्स दिले आहेत. यात 6-एअरबॅग्स, एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल, हिल असिस्ट, गाइड लाइन्स, रिअर कॅमेरा आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम यांसारखे फीचर्स आहेत.

उपलब्धता आणि वॉरंटी –
देशातील 11 शहरांमध्ये 15 डिलर्सकडे ही कार उपलब्ध असेल. याच्या बॅटरीवर 8 वर्ष/1,60,000 किलोमीटरपर्यंत वॉरंटी मिळेल. या कारवर 3 वर्ष/अमर्यादित किलोमीटरची वॉरंटी आहे.

किंमत –
25.30 लाख रुपये इतकी या एसयूव्हीची एक्स-शोरुम किंमत असून काही दिवसांनंतर किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.