News Flash

Hyundai ची नवीन Grand i10 लाँच, किंमत पाच लाखांपासून सुरू

ही कार म्हणजे थर्ड जनरेशन आय 10

Hyundai ची नवीन Grand i10 कार आज भारतात लाँच करण्यात आली आहे. Hyundai Grand i10 Nios या नावाने ही कार भारतीय बाजारात दाखल झालीये. चार व्हेरिअंटमध्ये (Era, Magna, Sportz, Asta) ही कार लाँच करण्यात आली आहे. मॅन्युअल ट्रांसमिशन, एएमटी आणि ड्युअल टोनसह Grand i10 Nios एकूण आठ पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. 4.99 लाख ते 7.99 लाख रुपयांदरम्यान या कारच्या विविध व्हेरिअंटची एक्स-शोरुम किंमत आहे. आठ रंगांमध्ये ही कार उपलब्ध असणार आहे. लाँचिंगआधीच कंपनीकडून या कारसाठी नोंदणी सुरू करण्यात आली होती. 11 हजार रुपयांमध्ये कंपनीच्या डिलर्सकडे किंवा ऑनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू आहे. मारुती स्विफ्ट आणि फोर्ड फिगो यांसारख्या कारशी i10 Nios ची स्पर्धा असेल.

ही कार म्हणजे थर्ड जनरेशन आय 10 आहे. सध्या बाजारात असलेल्या Grand i10 पेक्षा नवीन Grand i10 Nios दिसण्यास वेगळी आहे. डिझाइन बऱ्याच प्रमाणात सँट्रोच्या प्रेरणेतून घेतल्याचं दिसतंय. यात शार्प प्रोजेक्टर हेडलँम्प्स आणि कॅस्केडिंग ग्रिल आहे. यामुळे कारची पुढील बाजू दमदार दिसतेय. मागील बाजूला बंपर रुंद देण्यात आले असून सध्याच्या बाजारातील मॉडलपेक्षा जरा अजून खाली आहे. नव्या कारचं रिअर लूक यामुळे स्पोर्टी दिसतंय.

इंटेरियर 
डॅशबोर्ड आणि डुअरपॅड्सवर डिम्पल्ड टेक्स्चर्ड फिनिशिंग आहे. यात अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार-प्लेसह 8-इंच टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टिम, ऑटोमॅटिक एसी, सनरूफ आणि ब्ल्यू-लिंक कनेक्टिव्हिटी सिस्टिमसह अनेक लेटेस्ट आणि ग्रँड आय10 च्या तुलनेत प्रीमियम फीचर्स आहेत.

इंजिन –
Grand i10 Nios मध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन असून हे इंजिन  82 bhp ऊर्जा आणि 114Nm टॉर्क निर्माण करतं. तसंच डिझेल इंजिन देखील 1.2-लिटरचं असून हे इंजिन 74 bhp ची ऊर्जा आणि 190 Nm टॉर्क निर्माण करतं. दोन्ही इंजिनसह 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रांसमिशन (AMT) चा पर्याय आहे. दोन्ही इंजिन बीएस-6 मानकांनुसार आहेत.  

मायलेज- पेट्रोल इंजिनचा मायलेज मॅन्युअल ट्रांसमिशनमध्ये 20.7 किलोमीटर प्रतिलिटर आणि डिझेल इंजिनचा मायलेज मॅन्युअल आणि एएमटीमध्ये 26.2 किलोमीटर प्रतिलिटर इतका असल्याचा कंपनीचा दावा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 20, 2019 2:14 pm

Web Title: hyundai grand i10 launched in india know all features and price sas 89
Next Stories
1 रिलायन्स जिओच्या लँडलाईन सेवेला सुरूवात
2 Realme च्या ‘स्वस्त’ स्मार्टफोनचा सेल; 1,500 रुपये कॅशबॅक व 5,300 रुपयांपर्यंत फायदा
3 Realme Days Sale : स्वस्तात मिळतायेत Realme स्मार्टफोन्स, जाणून घ्या ऑफर्स
Just Now!
X