News Flash

Hyundai ची सर्वात स्वस्त कार झाली महाग, Santro प्रेमींना बसला झटका

'हॅचबॅक' प्रकारातील लोकप्रिय सँट्रो कार झाली महाग

नव्या आर्थिक वर्षात अनेक कार कंपन्या आपल्या वाहनांच्या किंमती वाढवत आहेत. अशात दक्षिण कोरियाची दिग्गज ऑटोमोबाइल कंपनी Hyundai Motors नेही भारतीय बाजारातील आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवल्या आहेत. त्यामुळे Hyundai Motors ची भारतातील सर्वात स्वस्त कार अशी ओळख असलेल्या सँट्रो कारपासून क्रेटा एसयूव्हीपर्यंत सर्व कार महाग झाल्या आहेत. किंमतीत वाढ झाल्याने कंपनीची हॅचबॅक प्रकारातील लोकप्रिय कार सँट्रो जवळपास 8,000 रुपयांनी महाग झाली आहे. निरनिराळ्या व्हेरिअंट्सच्या आधारे सँट्रोच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.

इंजिन आणि मायलेज :-
Hyundai Santro बीएस-6 मध्ये 1086 cc क्षमतेचं 4-सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 5500 rpm वर 68 hp ऊर्जा आणि 4500 rpm वर 99 Nm टॉर्क निर्माण करतं. या हॅचबॅक कारच्या इंजिनसोबत 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. Santro बीएस-6 कारमध्ये जवळपास 20 किलोमीटर प्रति लीटर मायलेज मिळतो असा कंपनीचा दावा आहे. तर, सीएनजी प्रकारातील सँट्रो 30 किलोमीटर प्रति किलोग्रामपर्यंत मायलेज देते.

आकर्षक फीचर्स :-
सँट्रोमध्ये अनेक आकर्षक फिचर्स आहेत. यात अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोचा सपोर्ट असलेली 7-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम, स्टीअरिंग माउंटेड कंट्रोल्स, रिअर एसी व्हेंट्स आणि रिअर सीट बेंच फोल्डिंग यांसारखे फिचर्स आहेत. सुरक्षेसाठी या कारमध्ये ड्रायव्हर एअरबॅग, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम (ABS), इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD), रिअर पार्किंग सेन्सर्स आणि स्पीड अलर्ट सिस्टिम असे स्टँडर्ड फिचर्सही आहेत.

नवीम किंमत :-
किंमतीत वाढ झाल्याने आता सँट्रोच्या बेसिक व्हेरिअंटसाठी (Era Exe) तुम्हाला 4.73 लाख रुपये मोजावे लागतील. यापूर्वी याची किंमत 4.67 लाख रुपये होती. तर, Sportz व्हेरिअंटची किंमत 5.56 लाख रुपये झाली आहे. यापूर्वी या व्हेरिअंटची किंमत 5.50 लाख रुपये होती. याशिवाय सँट्रोच्या टॉप मॉडेल Asta AMT ची किंमतही आता 6.35 लाख रुपयांवरुन 6.41 लाख रुपये झाली आहे. सर्व एक्स-शोरुम किंमती आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 4:44 pm

Web Title: hyundai santro price hike check new price of santro 2021 and specifications sas 89
Next Stories
1 भारतात PUBG Lite चा Game Over! २९ मेपासून प्लेयर सपोर्टही होणार बंद
2 Vivo चा नवीन 5G स्मार्टफोन भारतात झाला लाँच, मिळेल दमदार प्रोसेसर अन् शानदार कॅमेराही
3 करोनाविरोधातील तंत्र
Just Now!
X