Hyundai कंपनीची Hyundai Venue ही नवीन एसयुव्ही कार आज म्हणजेच 21 मे रोजी लाँच होणार आहे. सब-कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमधील ही कार देशातील पहिली मेड-इन-इंडिया कनेक्टेड कार ठरेल असा कंपनीचा दावा आहे. फोर्ड इकोस्पोर्ट, महिंद्रा XUV300 ,टाटा नेक्सॉन आणि सब-कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमधील ‘बॉस’ म्हणून ओळख असलेल्या मारुती सुझुकीच्या व्हिटारा ब्रेझा या गाड्यांशी Venue ची थेट टक्कर असणर आहे.  कारच्या जवळपास प्रत्येक प्रकारात मारुतीशी स्पर्धा करणाऱ्या Hyundai कंपनीकडे सब-कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये मारुतीला टक्कर देण्यासाठी आतापर्यंत कार नव्हती. पण आता ही कमतरता Venue पूर्ण करणार आहे.

 2 मे पासूनच या सब-कॉम्पॅक्ट SUV साठी आगाऊ नोंदणी सुरू झाली असून ग्राहकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवशी या गाडीच्या 2 हजाराहून अधिक युनिट्सची बुकिंग झाली. दरतासाला या गाडीसाठी 84 बुकिंग येत असल्याचंही समजतंय. कंपनीच्या संकेतस्थळावर अथवा कंपनीच्या डिलर्सकडे 21 हजार रुपयांमध्ये या कारसाठी बुकिंग सुरु आहे.

Air India Air Transport Services Limited jobs 2024
AIATSL recruitment 2024 : एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेसमध्ये मोठी भरती; पाहा नोकरीची माहिती….
d subbarao rbi former governor
तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता होऊनही भारत गरीबच राहणार – RBI चे माजी गव्हर्नर
world's first self-driven electric
एप्रिल फुल नव्हे, खरचं चालकाशिवाय धावतेय ही दुचाकी! भाविश अग्रवालने केली Ola Soloची घोषणा, पाहा Video
first Indian woman who joined Unicorn Club
‘अब्ज डॉलर’ कंपनी चालवणारी ‘ही’ भारतीय महिला Unicorn Club मध्ये झाली सामील! कोण आहे जाणून घ्या

Hyundai Venue 33 नव्या फीचर्ससह पहिली मेड-इन इंडिया कनेक्टेड कार असेल, असा दावा कंपनीने केला आहे. 33 पैकी 10 फीचर केवळ भारतासाठी विकसित करण्यात आले आहेत. यातील काही आधुनिक फीचर्स केवळ BMW7 सारख्या कारमध्ये पहायला मिळतात. Hyundai Venue मधील 33 कनेक्टेड फीचर एखाद्या अॅप किंवा ह्युमन मशीन इंटरफेसद्वारे जोडले जातील. या कारमध्ये कंपनीने ‘ब्ल्यूलिंक’ कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

ही कार चार व्हेरिअंट आणि तीन इंजिनच्या पर्यायांसह उपलब्ध असणार आहे. अद्याप व्हेरिअंट्सबाबत अधिकृत माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाही. या SUV मध्ये नवीन 1.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन, 1.2-लिटर नॅचरली अॅस्पायरेटेड पेट्रोल इंजिन आणि 1.4-लिटर डिझेल इंजिन मिळेल. थ्री-सिलिंडर टर्बोचार्ज्ड इंजिनासह 7-स्पीड ड्युअल-क्लच ट्रांसमिशन मिळेल, तर 1.2-लिटर पेट्रोल आणि 1.4-लिटर डिझेल इंजिनमध्ये अनुक्रमे 5 आणि 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळेल.

विशेषतः भारतासाठी विकसित करण्यात आलेल्या फीचर्समध्ये ड्रायव्हिंग इंफॉर्मेशन/ बिहेवियर, डेस्टिनेशन शेअरिंग, रिअल टाइम व्हेइकल ट्रॅकिंग, व्हेइकल लोकेशन शेअरिंग, जिओ-फेंस अलर्ट, स्पीड अलर्ट, टाइम फेंसिंग अलर्ट, वॉलेट अलर्ट, आयडल अलर्ट आणि व्हॉइस रिकग्निशन या फीचर्सचा समावेश असण्याची शक्यता आहे.
8 ते 12 लाख रुपयांच्या दरम्यान या एसयुव्हीची किंमत असण्याची शक्यता आहे.