14 July 2020

News Flash

हवेतील प्रदूषक घटक शोषणारी कविता ; कला व विज्ञानाचा सुरेख संगम

हवा स्वच्छ करणारी पहिली कविता ब्रिटनच्या संशोधकांनी तयार केली आहे. ही कविता किमान २० मोटारींनी केलेले हवा प्रदूषण शोषून घेऊ शकते.

| May 20, 2014 12:15 pm

हवा स्वच्छ करणारी पहिली कविता ब्रिटनच्या संशोधकांनी तयार केली आहे. ही कविता किमान २० मोटारींनी केलेले हवा प्रदूषण शोषून घेऊ शकते. विशिष्ट पद्धतीने तयार केलेल्या पदार्थापासून ही कविता शेफिल्ड विद्यापीठाच्या संशोधकांनी साकारली असून ती वातावरणातील नायट्रोजन शोषून घेते.
प्रसिद्ध कवी व प्राध्यापक सिमॉन आर्मिटेज व विज्ञानाचे प्राध्यापक व प्र कुलगुरू टोनी रायन यांनी इन प्रेज ऑफ एयर नावाची ही कविता आजूबाजूची हवा शुद्ध करणाऱ्या पदार्थाचा वापर करून मुद्रित केली आहे. हे तंत्रज्ञान अतिशय स्वस्त असून जाहिरातीचे फलक किंवा बिलबोर्ड यांच्यात त्याचा वापर केल्यास प्रदूषण कमी होऊ शकेल. दहा बाय वीस आकाराच्या विशिष्ट आवरण असलेल्या पृष्ठभागावर ती मुद्रित केली आहे.
त्यावर प्रदूषक कण शोषणारे टिटॅनियम ऑक्साईडचे कण लावलेले असतात. ते सूर्यप्रकाश व ऑक्सिजन यांच्या वापरातून नायट्रोजन ऑक्साईड या प्रदूषकाशी अभिक्रिया करून हवा शुद्ध करतात. विज्ञान व कला शाखेचा हा सुरेख संगम असून हवा शुद्धीकरण ही काळाची गरज आहे असे रायन यांनी सांगितले.
प्रदूषण टाळले गेल्याने अनेक लोकांचे जीव वाचतील. ही कविता म्हणजे एक जाहिरात पोस्टर असून त्यामुळे हवा शुद्ध होते,
विशेष तंत्राच्या वापरामुळे पोस्टरची किंमत १०० पौंडांनी वाढते. ही कविता विद्यापीठाच्या वेस्टर्न बँक येथील आल्फ्रेड डेनी इमारतीच्या परिसरात वर्षभर लावली जाणार आहे. कपडे धुण्याच्या अपमार्जकांमध्ये (डिर्टजट) या तंत्राचा वापर करावा म्हणजे कपडेही प्रदूषण कमी करण्यास मदत करतील असे रायन यांचे मत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2014 12:15 pm

Web Title: i write in praise of air a catalytic poem absorbing air pollutants on a nanotechnology enabled billboard
टॅग Poem,Poetry
Next Stories
1 कर्करोगास वाहनांचा धूर कारणीभूत
2 भारतात मातामृत्यूंच्या प्रमाणात घट
3 कोकाकोला व पेप्सीको घातक पदार्थाचा वापर थांबविणार
Just Now!
X