05 March 2021

News Flash

#GoogleForIndia 2018: गुगलने भारतीयांसाठी आणली ‘नव’रत्नांची भेट

भारतामध्ये रोज इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ३९ कोटी

गुगल फॉर इंडिया

जगामधील सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक असणाऱ्या गुगलने आज दिल्लीत झालेल्या गुगल फॉर इंडियाच्या चौथ्या एडिशनमध्ये भारतीयांसाठी नवरत्नांचा पेटाराच खुला केला आहे. भारतामध्ये रोज इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या ३९ कोटी असल्याचे सांगतानाच गुगलने प्रत्येक इंटरनेट वापरणाऱ्यापर्यंत पोहचण्यासाठी नवीन फिचर्स आणि सुविधा लॉन्च केल्या आहेत. यामध्ये काही विशेष सुविधा काही राज्यांसाठी मर्यादीत असल्या तरी भरातातील सर्वच नेटकऱ्यांसाठी भन्नाट सुविधा लॉन्च केल्या आहेत. जाणून घेऊयात या सुविधांबद्दल.

नवलेखा
आजही पारंपारिक पद्धतीने लिखाण करणाऱ्या लेखकांनी आपले लिखाण ऑनलाइन आणावे म्हणून हा विशेष प्रयोग सुरु करण्यात आला आहे. दिल्लीमध्ये या प्रयोगाअंतर्गत अनेकांनी लिहायला सुरुवात केली आहे. अधिक माहितीसाठी g.co/navlekha या लिंकवर क्लिक करावे.

‘गुगल गो’वर ऑडिओची सोय
वेबपेजेस मोठ्याने वाचून दाखवणारे नवीन ऑडिओ फिचर गुगलने लॉन्च केले आहे. यामध्ये मराठी, बंगाली, मल्याळम भाषांचा समावेश असेल. लवकरच २८ भारतीय भाषांमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. ही सेवा टू जी इंटरनेट रेंजवरही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

आर्टिफिशीयल इंटेलिन्सने सोडवणार समस्या
गुगल एआयच्या मदतीने पुरासंदर्भातील इशारा देण्यापासून ते मधुमेहाच्या चाचण्यांपर्यंत अनेक गोष्टी करता येणार.

गुगल असिस्टंट
हिंदी किंवा इंग्रजीबरोबरच आता प्रदेशिक भाषांमध्ये गुगल असिस्टंट उपलब्ध होणार. यामध्ये सध्या मराठीमध्ये सेवा उपलब्ध होणार असून लवकरच इतर सात भारतीय भाषांमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल.

प्लस कोड्स
कोलकात्यामधील एक लाख लोकांचे पत्ते गुगलवर उपलब्ध करुन देणार. या प्रकल्पाअंतर्गत २५ हजार घरांना गुगल मॅपवर पाहता येतील.

मॅप्स अपडेट होणार
गुगलने टर्न बाय टर्न म्हणजेच पावलोपावली अपडेट देणारे खास मॅप्स भारतीयांसाठी लॉन्च केले आहेत. यामध्ये सार्वजनिक वाहतूकीसासंदर्भातील माहितीही दिली जाईल. भारतामधील दीड हजार शहरांचे नकाशे अपडेट केले जातील. तर या शहरांमधील २० हजार बसमार्गांची माहिती नकाशांवरच उपलब्ध करून दिली जाईल.

आंध्रप्रदेशमध्ये गुगल स्टेशन्स
आंध्रप्रदेशमधील लोकांसाठी गुगलने खास उपक्रम सुरु केला आहे. यामध्ये राज्यातील लोकांना जलद आणि सोप्प्या पद्धतीने इंटरनेट उपलब्ध करुन देण्यात येणार. यासाठी वायफाय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार. या मोहिमेअंतर्गत १२ हजार शहरे गावे इंटरनेटने जोडली जाणार आहेत.

गुगल पे
गुगलने आपल्या पेमेन्ट अॅप्लिकेशनचे तेज हे नाव बदलून गुगल पे असे केले आहे.

अॅण्ड्रॉइड पाय
गुगलने आपल्या अॅण्ड्रॉइडच्या पाय व्हर्जनची (अॅण्ड्रॉइड गो) घोषणा केली आहे. त्यामुळे आता भारतामध्ये अॅण्ड्रॉइड पाय उपलब्ध होणार आहे. मायक्रोमॅक्स, लावा, नोकीया फोनमध्ये अॅण्ड्रॉइड गो लवकरच उपलब्ध होईल. याशिवाय पुढील महिन्यामध्ये सॅमसंग कंपनी भारतातील पहिला अॅण्ड्रॉइड गोवर चालणारा फोन लॉन्च करणार आहे.

आता गुगलने या सुविधा लॉन्च केल्यानंतर इंटरनेटचा प्रसार होण्यास नक्कीच मदत होईल. त्याचप्रमाणे नवीन सोयींमुळे सध्या इंटरनेट वापरत असणाऱ्यांसाठीही इंटरनेटचा वापर अधिक सोप्पा होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 2:27 pm

Web Title: icymi here are all the announcements from google for india 2018
Next Stories
1 जॉली म्हाताऱ्याचा श्रावण
2 कर्करोग निदानाची प्रभावी पद्धत विकसित
3 स्वयंपाकघरातून रिटायर व्हा
Just Now!
X