News Flash

जिओला टक्कर देण्यासाठी आयडियाचा 159 रुपयांचा नवा प्लॅन

व्होडाफोन आणि आयडिया एकत्र आल्यापासून या दोन्ही कंपन्या आपल्या इंटरनेट आणि कॉलिंगच्या प्लॅनमध्ये सातत्याने बदल करत आहेत.

व्होडाफोन आणि आयडिया एकत्र आल्यापासून या दोन्ही कंपन्या आपल्या इंटरनेट आणि कॉलिंगच्या प्लॅनमध्ये सातत्याने बदल करत आहेत. आता आयडियाने 159 रुपयांच्या रिचार्जची घोषणा केली आहे. यामध्ये युजरला दरदिवशी एक जीबी डेटा आणि अमर्यादित कॉलिंग करता येणार आहे. या ऑफरद्वारे रिलायंस जिओला थेट टक्कर देण्याचा आयडियाचा प्रयत्न असणार आहे.

आयडियाच्या 159 रुपयांच्या प्लॅनची वैधता 28 दिवस असणार आहे. दररोज अमर्यादित कॉलिंगची सुविधा देण्यात येईल असं कंपनीने सांगितलं असलं तरी यात युजरला रोज 250 मिनिटांचा आणि आठवड्याला 1000 मिनिटांचा टॉकटाइम मिळेल, दिवसाला 100 एसएमएस देखील मोफत असणार आहेत. या प्लॅनद्वारे जिओ आणि एअरटेलच्या 149 रुपयांच्या प्लॅनला टक्कर देण्याचा कंपनीचा प्रयत्न असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 3:29 pm

Web Title: idea 159 rs new plan
Next Stories
1 कापड उद्योगात पतंजलीचा प्रवेश, दिवाळीच्या मुहूर्तावर दालनाचे उद्घाटन
2 Flipkart Big Diwali Sale आज शेवटचा दिवस, ‘या’ स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट
3 JioPhone 2 खरेदी करणं झालं सोपं, आजपासून ओपन सेल सुरू
Just Now!
X