जिओने मार्केटमध्ये दमदार एन्ट्री केल्यानंतर सर्वच स्पर्धक कंपन्या आपल्या ग्राहकांना आकर्षक ऑफर देऊ करत आहेत. नुकतीच जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष कॅशबॅक ऑफर जाहीर केल्यानंतर आता आयडियानेही आपल्या ग्राहकांसाठी अनोखी कॅशबॅक ऑफर जाहीर केली आहे. आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी मॅजिक कॅशबॅक ऑफर सादर केली आहे. तुम्ही जर आयडिया ग्राहक असला आणि तुम्हाला या प्लॅनचा लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन आणि डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रिचार्ज करा. ही ऑफर ३९८ रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांसाठी लॉन्च करण्यात आला आहे. ३९८ पेक्षा अधिक रुपयांचा रिचार्ज केल्यास ३,३०० रुपयांचा फायदा मिळेल. आयडिया युजर्सला ही रक्कम कॅशबॅकच्या माध्यमातून परत मिळेल.

आयडियाचा हा प्लॅन सर्वात जास्त कॅशबॅक असणारा प्लॅन आहे. आयडियाचे ३९८ रुपयांचा रिचार्ज केल्यास तुम्हाला ४०० रुपयांचे कॅशबॅक व्हाऊचर मिळेल. यासाठी तुम्हाला ५० रुपयांचे ८ व्हाऊचर मिळतील. डिस्काऊंट व्हाऊचर एका वर्षाच्या दरम्यान ३०० हून अधिक रुपयांचे रिचार्ज करण्यासाठी वापरु शकतात. याबरोबरच आयडिया युजर्सना २,७०० रुपये किंमतीचे शॉपिंग कूपन दिले जातील. हे कूपन तुम्ही आयडियाच्या वेबसाईटवर शॉपिंगसाठी वापरू शकता. ही ऑफर १० फेब्रुवारीपर्यंत मर्यादित असेल असेही कंपनीकडून सांगण्यात आले आहे. माय आयडिया अॅप किंवा आयडियाच्या वेबसाईटवरून रिचार्ज केल्यास तुम्हाला २०० रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. या कॅशबॅकची एकूण किंमत ३३०० रुपये असेल. आयडियाचे ३९८ रुपयांचा रिचार्ज केल्यावर तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग दररोज १ जीबी डेटा आणि १०० एसएमएस दिले जातील. या पॅकची व्हॅलिटीडी ७० दिवसांची आहे.

जिओने नुकतीच आपली आणखी एक ऑफर जाहीर केली होती. यामध्ये ३९८ रुपयांच्या रीचार्जवर ग्राहकांना ७०० रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळणार आहे. ऑनलाइन रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना ही ऑफर मिळणार असून ती ३१ जानेवारीपर्यंत उपलब्ध असेल असे सांगण्यात आले होते. तुम्ही ३९८ रुपयांपेक्षा जास्त रुपयांचे रिचार्ज केले तर तुमच्या वॉलेटमध्ये ३०० रुपये येतील. याशिवाय जिओच्या अॅपमध्ये ५० रुपयांचे ८ व्हाऊचर मिळतील. त्यामुळे पुन्हा रिचार्ज करायचे असल्यास ग्राहकांना हे व्हाऊचर वापरता येतील. याशिवाय अँमेझॉन पे, फोन पे, फ्रिचार्ज आणि पेटीएमसारख्या इतर वॉलेटमधून रिचार्ज केल्यावर आकर्षक ऑफर्स देण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले होते.