आपल्या दैनंदिन जीवनातील एखाद्या कामापेक्षा सोशल मीडियावर अपडेट राहणे मागच्या काही काळात अनेकांसाठी महत्त्वाचे झाले आहे. आयुष्यात थोडे काही झाले की ते अपडेट करणे नाहीतर ज्यांनी अपडेट केले असेल त्यावर आपली प्रतिक्रिया नोंदवणे फारच महत्त्वाचे मानले जाऊ लागले आहे. अगदी झोपेतून उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपली बोटं आणि नजर मोबाईलवर खिळलेली असते. सोशल मीडियाचा जास्त वापर केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात हे आपल्यला माहितही असते. मात्र आपल्याला त्याचे इतके व्यसन असते की या समस्यांकडे आपले नकळत दुर्लक्ष होते. सोशल मीडियाच्या जास्तीच्या वापराने शारीरिक समस्यांबरोबरच मानसिक समस्याही उद्भवतात. मात्र सोशल मीडियाच्या वापरामुळे कोणतेही त्रास उद्भवू नयेत यासाठी काही सोप्या टीप्स नक्की उपयोगी पडतील.

थोडा ब्रेक घ्या – आपण सोशल मीडियावर सतत वेळ घालवत असू तर आपण टाईमपास करतोय असे नाही. काही वेळा आपण चांगल्या गोष्टींसाठीही त्याचा वापर करु शकतो. पण सतत सोशल मीडियावर अॅक्टीव्ह राहील्यास मानसिक तणाव आपल्यावर हावी झाले आहेत असा याचा अर्थ होतो. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला अशाप्रकारे तणाव आहे असे वाटेल तेव्हा काही दिवसांसाठी सोशल मीडियापासून लांब राहा. ज्या लोकांना आपल्याशी कनेक्ट राहायचे असते ते आपली नक्की वाट पाहतात यावर विश्वास ठेवा.

forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
puberty starting earlier and why it matters health experts Said About signs caution and care You Must Know About
कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती? त्यावर काही उपचार आहेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला…
Francis Scott Key Bridge in Baltimore
जहाजाची धडक अन् नदीवरील ब्रिज पत्त्यासारखा कोसळला, VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का!

सिलेक्टीव्ह राहायला शिका – सोशल मीडियावर रोज हजारो गोष्टी अपडेट होत असतात. ती प्रत्येक गोष्ट आपल्याला माहित पाहीजे आणि आपण ती पाहिली पाहिजे असे नाही. यामुळे आपल्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाचा वेळ विनाकारण वाया जातो. त्यामुळे सोशल मीडियावर सिलेक्टीव्ह राहणे आवश्यक आहे. आपल्या गरजेनुसार आपल्याला आवश्यक असणाऱ्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमचा सोशल मीडियाचा वापर निश्चितच अर्थपूर्ण होईल.

थोडक्यात आनंदी राहा – एकावेळी भरपूर पोस्ट केल्यावर तुमच्याकडे लोकांचे लक्ष वेधले जाईल असे नाही. त्यामुळे विनाकारण एकामागे एक पोस्ट करत राहणे यात काहीच तथ्य नसते. जे पोस्ट कराल ते चागंले असेल याकडे लक्ष द्यायला हवे. उगाचच कोणाशीही जोडले जाऊन स्वत:चा वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा जे चांगले आहेत आणि तुमच्या विचारांशी ज्यांची विचारधारा जुळते त्यांच्याशीच कनेक्ट राहा.

क्रीएटीव्ह राहण्याचा प्रयत्न करा – सतत मोबाईल आणि लॅपटॉपवर अवलंबून राहू नका, कधीतरी ही उपकरणे बाजूला ठेऊन तुम्हाला आतून आवडतील अशा गोष्टी नक्की करा. त्या तुम्हाला नक्कीच जास्त आनंद देऊन जातील. यामध्ये चित्रकला करणे, लिहीणे अगदी शिवणकाम किंवा एखादी छान शोभेची वस्तू बनविणे असे काहीही असू शकेल. त्यामुळे तुमचा आतला आवाज ऐकायला शिका. त्यामुळे तुम्ही नक्कीच जास्त आनंदी व्हाल.