शिक्षण पूर्ण झाले की नोकरी शोधणे हे ओघानेच आले. ग्लोबलायझेशनमुळे सध्या देशातील आणि परदेशातीलही बड्या आय़टी कंपन्या देशात वेगाने वाढत आहेत. या कंपन्यांना हवे असलेले कुशल मनुष्यबळ त्यांना मेट्रो सिटीमध्ये सहज उपलब्ध होते. मात्र अशा मोठ्या कंपन्यांमध्ये मुलाखतीला जाताना तिथे काय विचारले जाईल असा प्रश्न तरुणांना असतो. तर या कंपन्यांमध्ये तुमचे शिक्षण, अनुभव यांबरोबरच असेही अनेक प्रश्न विचारले जातात जे तुम्हाला कोड्यात टाकणारे असतात. पण या प्रश्नांची उत्तरे तुम्ही किती स्मार्टपणे देता यालाच या कंपन्यांतील मुलाखत घेणारे लोक जास्त महत्त्व देतात. तर अशा मल्टी नॅशनल कंपन्यांमध्ये विचारले जाणारे काही प्रश्न आपल्याला माहित असायला हवेत. पाहूयात प्रतिष्ठीत टाटा कन्सलटन्सी सर्व्हीसेस म्हणजेच टीसीएस कंपनीतील विविध पदांसाठी मुलाखतीला आलेल्या उमेदवारांना विचारण्यात आलेले काही प्रश्न…

१. तुम्हाला अंदमान-निकोबार बेटावर पाठवण्यात आले तर तुमची तयारी आहे का?

२. फेसबुकमध्ये काही बदल करायचा झाल्यास तुम्ही काय कराल?

३. विश्लेषण करायची तुमची पद्धत काय? तुम्ही एखाद्या गोष्टीचे विश्लेषण कसे कराल ते सांगा.

४. क्रीकेटला तुम्ही भौतिकशास्त्राशी कसे आणि कुठे जोडाल?

५. तुमच्या मताप्रमाणे ग्राहक म्हणजे कोण?

६. तुम्हाला माहित असलेल्या आयटी कंपन्यांची नावे सांगा.

७. तुम्हाला इन्फोसिस आणि टीसीएस अशा दोन्ही कंपन्यांकडून ऑफर मिळाली तर तुम्ही कोणती कंपनी निवडाल? का?

८. अंध व्यक्तीसाठी तुम्ही कसे घर बांधाल?

९. तुम्हाला आयटीमध्ये काम करुन कंटाळा आला तर तुम्ही काय कराल?

१०. या कंपनीत तुम्हाला पुरेसा पगार मिळत नाही तरीही तुम्हाला का रुजू व्हायचे आहे?