News Flash

पोटाचा घेर कमी करायचाय? 

आहारात 'या' गोष्टींचा समावेश करा

प्रातिनिधिक छायाचित्र - पोटाचा वाढलेला घेर

माझं पोट खूप वाढलंय यार, आता आणखी काहीतरी करायलाच हवं आता, मी रोज इतका चालतो तरी पोटाचा घेर काही केल्या कमीच होत नाही. असे संवाद आपण सर्रास ऐकतो. पण आपण अवलंबत असलेले पर्याय योग्य दिशेने नसल्याने हा घेर कमी होत नाही. यामध्ये आहार, व्यायाम या दोन्हीचाही तितकाच वाटा असतो. त्यामुळे पोट कमी करण्यासाठी आराहामध्ये काही बदल केल्यास त्याचा नक्कीच उपयोग होऊ शकतो. काय आहेत हे उपाय जाणून घेऊया…

१. अॅव्होकॅडो – हे एकप्रकारचे फळ असून वजन कमी होण्यासाठी आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी त्याचा निश्चितच उपयोग होतो. या फळामध्ये अमिनो अॅसिड असते, त्या अॅसिडचा उपयोग शरीराची चरबी कमी करण्यासाठी होतो. या फळामध्ये मोठ्या प्रमाणात फायबरही असते. फायबरमुळे पोट लवकर भरते आणि दिर्घकाळ भूक लागत नाही. त्यामुळे जास्त खाल्ले जात नाही. याशिवाय या फळामध्ये अॅलर्जिला विरोध करणारे, जिवाणूविरोधी गुण असतात. त्यामुळे आरोग्य चांगले राहण्याबरोबरच सौंदर्य टिकविण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.

२. सफरचंद – सफरचंद हे आपल्या देशात आणि राज्यातही सहज उपलब्ध होणारे फळ आहे. मात्र काही प्रमाणात महाग असलेल्या या फळामध्ये फायबर, फ्लॅवोनोईडस, बेटा केरोटीन आणि फायटोस्टेरॉल हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे सफरचंद खाल्ल्याने पोट लगेच भरते आणि विनाकारण खाण्याचे प्रमाण कमी होते. ज्या महिला दिवसातून ३ ते ५ सफरचंद खातात त्यांचे वजन वेगाने कमी होण्यास मदत होते.

३. काकडी – काकडी ही तुम्हाला ताजीतवानी ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. याशिवाय काकडीमध्ये कॅलरीजचे प्रमाण अतिशय कमी असते. १०० ग्रॅम काकडीमध्ये ९५ टक्क्यांहून जास्त पाणी असते तर ४० टक्के कॅलरी, खनिजे, फायबर आणि जीवनसत्त्वे असतात. शरीरातील अनावश्यक टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी काकडी उपयुक्त ठरते. याशिवाय रक्तप्रवाह सुधारण्यासही काकडीचा आहारातील समावेश महत्त्वाचा ठरतो. याशिवाय त्वचा उजळ दिसावी यासाठीही काकडीचा उपयोग होतो.

४. मूग डाळ – जवळपास सर्व भारतीय स्वयंपाकघरात मूगडाळ असते. या डाळीमध्ये ए,बी,सी आणि ई ही जीवनसत्त्वे असतात. याशिवाय कॅल्शियम, आयर्न आणि पोटॅशिअम यासारखी खनिजेही मूग डाळीतून मिळतात. याशिवाय मूग डाळीत प्रथिने आणि फायबरचे प्रमाणही जास्त असल्याने वजन कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. मूग डाळीने लवकर पोट भरते त्यामुळे अनावश्यक खाणे टाळले जाते. याचा वजन आणि विशेषतः पोट कमी होण्यास उपयोग होतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 1:30 am

Web Title: if you want to lose your belly you must eat this things
Next Stories
1 गरोदर स्त्रियांनो उत्तम गर्भासाठी ‘ही’ आसने जरुर करा
2 ‘ही’ आहेत कांचीपुरम साडीच्या नक्षीची वैशिष्ट्ये 
3 आहारात ‘या’ पदार्थाचा समावेश ठेवाच; शुगर आणि कोलेस्टेरॉलची आटोक्यात येण्यास होईल मदत
Just Now!
X