रोगांपासून दूर राहण्यासाठी आपल्या शरिरात रोग प्रतिरोधक पेशी असतात. या पेशी रोगांपासून आपले संरक्षण करतात. याच पेशी कर्करोगासारख्या आजारापासूनही संरक्षण करणार असल्याचा शोध संशोधकांनी लावला आहे. संशोधकांनी केलेल्या संशोधनात कर्करोगाला नष्ट करणा-या प्रतिरोधक पेशीचा शोध लागला आहे. या पेशी कर्करोगाच्या जीवाणूंना लढा देत असतात. त्यामुळे या प्रतिरोधक पेशींना ‘माइलोईड डिराईव्ह सप्रेसर सेल्स’ असे म्हटले जात आहे. कर्करोगाच्या जीवाणूंना पूर्णपणे नष्ट करणारी पेशी असा याचा अर्थ होतो.
इम्युनिटी जर्नलमध्ये यासंबंधीचा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. या अहवालानुसार, कर्करोगाच्या स्टेम पेशी या रासायनिक संयुग वापरून केलेली रोगाची विशिष्ट प्रकारची प्रतिरोधक शक्ती आहेत. काही संशोधकांनी कर्करोगाच्या धोकादायक असणा-या पेशींचा शोध लावला असून या पेशींमुळे कर्करोग पुन्हा बळावण्याची शक्यता आहे.