आईने बाळाला मिठी मारल्यामुळे बाळाच्या रोगप्रतिकारकशक्तीमध्ये वाढ होत असून, त्यामुळे बाळाच्या हृदयाची गती आणि शरीराचे तापमान योग्य राहण्यास मदत होत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. चेहऱ्यावर एक स्मितहास्य दाखवण्यापेक्षा मिठी मारणे अधिक फायदेशीर असल्याचे एका सर्वेक्षणामध्ये डॉक्टरांनी म्हटले आहे.

लहान मुले आईने घातलेली मिठी ओळखतात, असा विश्वास ९० टक्के डॉक्टरांनी सर्वेक्षणात व्यक्त केला आहे. डायपर तयार करणाऱ्या ‘हगीस’ या कंपनीने दिल्ली, मुंबई, बेंगळूर, चेन्नई आणि कोलकाता येथे दोन हजार माता आणि पाचशे वैद्यकीय व्यावसायिक यांच्या केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. आई आणि बाळ यांच्यामध्ये मिठीची शक्ती जाणून घेण्याचा या सर्वेक्षणाचा उद्देश होता.

Ramzan 2024
रमजान: जगातील विविध धर्मीय उपवासाच्या परंपरा नक्की काय सांगतात?
risk of H5N1 bird flu outbreak Case Was Seen in Hens At Nagpur
कोविडहुन १०० पट जास्त भीषण विषाणू उड्या मारतोय! नागपुरातही आढळलं प्रकरण, तज्ज्ञांचं मत काय?
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता
Mangal Budh Yuti
एप्रिलमध्ये ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? १८ महिन्यानंतर २ ग्रहांची युती होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी

सर्वेक्षणातील जवळपास ७६ टक्के डॉक्टरांनी आईने मिठीत घेतल्यामुळे बाळाच्या प्रतिकारकशक्तीमध्ये वाढ होत असल्याचा विश्वास व्यक्त केला. बाळाला मिठीत घेतल्याने बाळाच्या हृदयाची गती योग्य राहते, रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते आणि ऑक्सिजनच्या पातळीत वाढ होते. एवढेच नव्हे तर बाळ रडायचे थांबते आणि त्याला आलेला ताणही कमी होण्यास मदत होत असल्याचे कंपनीने सर्वेक्षणात म्हटले आहे.

आईने आलिंगन दिल्यामुळे संप्रेरक वाहण्यास सुरुवात होते व त्यामुळे शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. सर्वेक्षणामध्ये ८५ टक्के डॉक्टरांनी मातांना बाळाला आलिंगन देण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. यामुळे आरोग्याचे फायदे मिळत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

बाळाला मिठीत घेण्यामुळे मिळणाऱ्या फायद्यांची जवळपास ८० टक्के महिलांना माहितीच नसते. जवळपास ९० टक्के भारतीय माता बाळाला मिठी मारून त्याच्याबाबतचे प्रेम व्यक्त करतात. बाळाला दिवसातून सात ते आठ वेळा मिठी मारल्यामुळे बाळाबाबतच्या चिंता कमी होत असल्याचा विश्वास ९१ टक्के महिलांनी व्यक्त केला आहे.