News Flash

सतत अशक्तपणा येतोय? मग गुळ-तूप खाण्याचे जाणून घ्या ‘हे’ फायदे

गुळ-तूप खाण्याचे फायदे

बऱ्याच जणांना जेवतांना किंवा जेवण झाल्यावर गोड पदार्थ खाण्याची सवय असते. मात्र, अनेकदा गोड पदार्थांमध्ये गुलाबजाम, बर्फी वगैरे असे पदार्थ खाल्ले जातात. परंतु, आयुर्वेदानुसार, जेवणानंतर गोड पदार्थ खाणं चुकीचं आहे. या पदार्थांमुळे पचनक्रिया मंद होते. त्यामुळे जेवण झाल्यावर गोड पदार्थ खाऊ नये असा सल्ला डॉक्टरदेखील देत असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे ज्यांना जेवण झाल्यावर गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते अशांसाठी गुळ-तूप हा सर्वोत्तम पर्याय आहे. गुळ आणि तूप खाण्याचे काही गुणकारी फायदेदेखील आहेत. त्यामुळे हे नेमके फायदे कोणते ते जाणून घेऊयात.
१. गूळ-तूप खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

२. शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात.

३. केस व नखांसाठी फायदेशीर.

४. अशक्तपणा आल्यास दूर होतो.

५. हाडे मजबूत होतात.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 6:52 pm

Web Title: immunity blood sugar hormones sweet cravings ghee gur jaggery dcp 98 ssj 93
Next Stories
1 कर्करोगग्रस्त रुग्णांनी अशी घ्या केसांची व त्वचेची काळजी!
2 जिओचं नवं ‘JioPages’ मेड इन इंडिया ब्राउझर लॉन्च; आठ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध
3 दसरा-दिवाळीसाठी नवीन गाडय़ा
Just Now!
X