01 June 2020

News Flash

लॉकडाउनमध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या टीप्स

महामारीत आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणत्या आहारविषयक टिप्स आहेत, त्या समजून घेऊयात...

– अंबिका नायर
शरीर हा एक गुंतागुंतीचा जीव आहे. त्यात स्वत:नेच बरे होण्याची क्षमता आहे. फक्त आपण त्याचा आवज ऐकणे आणि योग्य पोषण व काळजी घेणे गरजेचे आहे. आपल्या शरीराच्या इंजिनाला आपणे जे इंधन घालतो, ते आपण ग्रहण केलेल्या पोषणातून थेट मिळते. ही पोषकमूल्ये कर्बोदके, अॅमिनो अॅसिड्स, लिपिडस, जीवनसत्वे, खनिजे, पाणी आणि तंतूंच्या स्वरुपात येतात. या पोषक घटकांमध्येच रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारे असून ते आपल्या रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास तसेच शरीराला रोगाविरुद्ध लढण्यास मदत करतात.

आपण जेवढ्या वेगवेगळ्या प्रकारे दिसतो, तेवढ्याच आपल्या शरीराच्या पोषक घटकांच्या गरजा वैशिष्ट्यपूर्ण असतात. त्यामुळे आपल्याला ‘रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या पोषक घटकांचा’ स्थिर आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. यात प्रथिने, फायटोकेमिकल्स, अँटी-अॉक्सिडंट्स, बायो-फ्लेव्होनॉइंड्स, ओमेगा-३ फॅट्स, जीवनसत्वे- क,ड,अ,ई, बी१२ इत्यादी तसेच झिंक, लोह, मॅग्नेशिअम, क्रोमिअम, सेलेनिअम आदी खनिजांचा समावेश आहे. चला, कोव्हिड-१९ च्या महामारीत आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कोणत्या आहारविषयक टिप्स आहेत, त्या समजून घेऊयात-

१. मिलेट्स, ओट्स यासारख्या कॉम्प्लेक्स कायब्रोहायड्रेटसह योग्य उपयुक्त प्रथिनांनी भरपूर असे डाळ, कडधान्ये, अंडी, पोल्ट्रीज यासारखे उच्च जैविक मूल्य असलेले प्रथिने, फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्सनी भरपूर असलेल्या भाज्या, फळे, प्रोबायोटिकने समृद्ध असलेले दही, तीळ, कारळाच्या बियांसारखे पोषक पदार्थांचा समावेश आहे.

2 लसूण, आले, लिंबू, दही किंवा ताक, आवळा, दालचिनी, ताजी फळे आणि भाज्या, आक्रोड, बदाम, जवस, सूर्यफूल बिया तसेच काळ्या मनूका, अंजिर , राजगिरा, तुळशीची पाने, हळद, काळी मिरी, भरपूर टोमॅटो हे सर्व तुमच्या दैनंदिन आहारात असले पाहिजे. हे सर्व रोगप्रतिकारशक्ती वर्धक आहेत.

३. ग्रीन टी, ताक, लिंबाचा रस, नारळपाणी आणि साध्या पाण्याच्या स्वरुपात भरपूर द्रवपदार्थ प्यावे. याद्वारे आपली यंत्रणा पुन्हा भरावी आणि पुन्हा रिहायड्रेट करावी..

४. एकदाच भरपूर जेवण्याऐवजी वारंवार थोड्या प्रमाणात खा. नाश्ता आणि जेवण हे दोन्ही संतुलित असावेत.

५. शरीराचे योग्य वजन राखण्यासाठी योग्य स्थितीवर यंत्रण ठेवत पुरेसे अन्न सेवन करा. या काळात आहाराच्या पद्धतीवर लक्ष ठेवा.

६. स्वयंपाकात मध्यम प्रमाणात मीठ वापरा. जागतिक आरोग्य संघटनेने दररोज ५ ते ६ ग्राम मीठ सेवन करण्याची शिफारस केली आहे. टेबलवर घेतलेल्या अन्नात मीठ घालणे टाळावे.

७. साखरयुक्त आणि अति तळलेले पदार्थ खाऊ नका. यात अपायकारक कॅलरी असतात. यामुळे वजन वाढते.

८. सर्व खाद्यपदार्थांमध्ये विविध स्तरांचे पोषक घटक असतात. कोणत्याही एका अन्नात सर्व महत्त्वाचे शरीरास आवश्यक असे पोषक घटक पुरेशा प्रमाणात समाविष्ट नसतात. त्यामुुळे योग्य प्रमाणात संतुलित आहार घ्यावा.

राजगिरा, अंजिर, आवळा, सफरचंद, सूका मेवा आणि जवस हे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी कसे आवश्यक आहेत, याविषयी काही तथ्य:

१. राजगिरा: राजगिरा हे अत्यंत पौष्टिक आणि ग्लूटेनरहित धान्य आहे. यात भरपूर प्रथिनयुक्त, फायबर, मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि अँटी ऑक्सिडंट्स असतात. विशेषतत: मॅगनीज, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आणि लोह यासारख्या आरोग्यास प्रोत्साहित करणाऱ्या अँटी ऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहेत. याद्वारे आपली रोगप्रतिकारक यंत्रणा मजबूत होते व कर्करोग, हृदयरोग यासारख्या तसेच संसर्गजन्य आजारापासून आपले संरक्षण होते.

२. अंजिर: अंजिर हे कॅल्शिअम, पोटॅशिअम, झिंक, कॉपर आणि ब जीवनस्त्व, फायबर यांचा मोठा स्रोत आहे. सुक्या अंजिरात फायब्रँड असून यामुळे बद्धकोष्टता कमी होते. कोलेस्टरॉल कमी होतो आणि साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. अंजिरात उत्तम दर्जाचे अँटी ऑक्सिडंट्स असून ते शरीरातील पेशींना इजा करणारे रॅडिकल्स कमी करण्याचे काम करतात.

३. आवळा: आवळा हे क जीवनसत्त्वाने समृद्ध आहे. यामुळे शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेला बळ देण्याचे काम केले जाते. त्यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो. याचे पौष्टिकत्व फ्लॅव्होनॉइड्स, गॅलिक अॅसिड, एलॉजिक अॅसिड यासारख्या पॉलिफेनोल्सच्या रेंजसह येते. कर्करोगाच्या पेशींच्या वाढीविरोधात लढण्यासाठी हे ओळखले जातात.

४. सफरचंद: या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या फळाचे प्रिबायोटिक फायदेही आहेत. यात पोषक रोगप्रतिकारक यंत्रणेसाठी तसेच आतड्यातील चांगल्या जीवाणूंच्या वाढीस आवश्यक असलेले फायबर मोठ्या प्रमाणावर असतात. अभ्यासाअंती हे सिद्ध झाले आहे की, सफरचंदातील विरघळणाऱ्या फायबरमुळे लठ्ठपणाशी निगडीत दाह कमी होतो आणि प्रतिकारक शक्ती मजबूत होते.

५. नट्स व सुकामेवा: नट्समध्ये भरपूर प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, मॅँगनीज, सेलेनियम इत्यादी असतात. यामुळे रोगप्रितकारक पेशी तसेच अँटीबॉडीज वाढतात. तसेच हे सुक्या मेव्यासोबत खाल्ल्यास प्रथिने आणि साखरेसह उत्तम प्रमाणात संतुलित जेवण होते. मात्र यासाठी योग्य नट्स निवडावेत. उदा. आक्रोड, बदाम, ब्राझील काजू, पिस्ता इत्यादी.

६. जवसाचे बी: जवसाच्या बियांमध्ये ओमेगा थ्री फॅटी अॅसिड, एमयूएफए, फोलेट, व्हिटॅमिन बी१ आणि बी६, फायबर हे मोठ्या प्रमाणावर असते. तसेच वनस्पतीमधील काही संयुगे असून गॅस्ट्रो इंटेस्टीनल हेल्थसाठी तसेच इतर आरोग्यासाठी असंख्य फायदे होतात.

सात्विक पोषकघटकांचे वरील तत्त्व आणि आपल्याला कोणत्या पोषकांची आवश्यकता आहे, हे जाणून घेतल्यास आपण आपले आरोग्य सुधारू शकतो. रोगाचा प्रतिबंध करु शकतो. तसेच निसर्गास पूरक असा सुसंवादी संतुलन साधू शकतो.

(लेखिका पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल न्युट्रिशनलिस्ट कन्सल्टंट आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2020 12:41 pm

Web Title: immunity booster what is the best immune booster nck 90
टॅग Coronavirus
Next Stories
1 हृदय निरोगी ठेवायचंय? मग ‘ही’ योगासने कराच
2 coronavirus : हायपरटेन्शन बद्दलची मिथके अन् तथ्य
3 प्रीक्लेम्पसिया म्हणजे काय? गरोदर स्त्रियांनी घ्या ‘ही’ काळजी
Just Now!
X