उन्हाळ्यात किंवा गर्भवतींसाठी आरोग्यदायी असणारे नारळ पाणी सर्वांसाठीच चांगले असते. आरोग्याला उपयुक्त असणारी सर्व प्रकारची खनिजे आणि इतर घटक यामध्ये असतात. नैसर्गिक असणारे हे आरोग्यदायी पेय दररोज प्यायल्यास त्याचा खूपच फायदा होतो. नारळपाणी हे पूर्णपणे कॅलरी फ्री नसते. मात्र इतर उष्ण आणि थंड पेयांपेक्षा त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण निश्चितच कमी असते. या पाण्याने तहान तर भागतेच पण पोटात शांत वाटते. त्यामुळे नारळ पाण्याचा आहारातील समावेश का महत्त्वाचा आहेत त्याची कारणे पाहूयात…

१. रक्तदाब नियंत्रित करण्यास उपयुक्त

loksatta Health Special article, relationship between, skin disorders, diabetes
Health Special: त्वचाविकार आणि मधुमेह नेमका काय संबंध?
What Is Sugar Made Of Milk Honey Table Sugar
साखर हे पांढरं विष? दूध, मध, साध्या साखरेत नेमकं असतं काय? १० दिवस साखर खाल्ली नाही तर कसं बदलेल शरीर?
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?

नारळपाण्यात मोठ्या प्रमाणात पोटॅशियम असते. सोडियमचे शरीरावर होणारे परिणाम नियंत्रित करण्यासाठी पोटॅशियमची आवश्यकता असते. मात्र योग्य प्रमाणात हे घटक शरीरात असणे आवश्यक असते.

२. डीहायड्रेशनवर उपयुक्त

शरीराला जास्त ताण पडला तर पुरेशा उर्जेची आवश्यकता असते. अशावेळी नारळपाणी अतिशय उपयुक्त ठरते. जास्त दगदग झाल्यास शरीरातील खनिजे आणि इतर आवश्यक घटक यांचे प्रमाण कमी होते. अशावेळी थकवा जाणवू लागतो. मात्र नारळपाण्याने हा थकवा दूर होण्यास मदत होते.

३. अन्नपचन होण्यास उत्तम उपाय

नारळपाण्यात कार्बोहायड्रेटस आणि सोडियमचे प्रमाण कमी असते. त्याचप्रमाणे पोटॅशियम आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. हे फायबर पचनशक्ती सुधारण्यास अतिशय उपयुक्त ठरते. त्यामुळे तुम्हाला सातत्याने पचनाचे त्रास उद्भवत असतील तर तुम्ही नारळ पाणी पिण्याची आवश्यकता आहे हे लक्षात घ्यायला हवे.