News Flash

‘ही’ आहेत जंताची लक्षणे

माहिती करुन घेणे गरजेचे

प्रातिनिधिक छायाचित्र

लहान मुलांमध्ये जंत होणे हे अतिशय सामान्य आहे. ही गोष्ट लवकर आणि सहज लक्षात येत नाही, मात्र त्याचे परिणाम आरोग्यासाठी त्रासदायक असतात. दिर्घकाळ मुलांच्या शरीरात जंत राहील्यास त्यांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. राज्यभरात शुक्रवारी १८ ऑगस्ट रोजी शासकीय आरोग्य यंत्रणेतर्फे राबविण्यात येणाऱ्या जागतिक जंतनाशक मोहिमेविषयी…

– जंताचा बालकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम

१. रक्तक्षय (अॅनिमिया )
२. पोटदुखी,उलट्या, अतिसार, मळमळणे
३. भूक मंदावणे
४. कुपोषण
५. थकवा व अस्वस्थता
६. शौचाच्या वेळेस रक्त पडणे
७. आतड्याला सुज येणे.

– असे रोखू शकता जंताच्या समस्येला

१. जेवणाच्या आधी स्वच्छ हात धुणे
२. स्वच्छ व उकळलेले पाणी पिणे.
३. पायात चपला,बुट घालणे
४. नियमित नखे कापणे
५. उघड्यावर शौचाला न बसणे

– जंताचा नाश केल्याने बालकांना होणारे फायदे
१. रक्तक्षय (अनिमिया)कमी होतो
२. बालक क्रियाशिल होते व रोग प्रतिकारकशक्ती वाढते.
३. शारिरीक व बौध्दिक वाढ सुधारते
४. आरोग्य चांगले राहते.

यासाठी अॅलबेंडोझोल ही जंतनाशक गोळी उपयुक्त आहे. वयवर्षे १ ते २ असलेल्यांना अर्धी गोळी (२०० मीलीग्रॅम) क्रश करून पाण्यात विरघळून द्यावी. २ ते ३ वर्षे वय असणाऱ्यांना एक गोळी (४०० मीलीग्रॅम) क्रश करून पाण्यात विरघळून द्यावी. ४ ते १९ वर्षे वय असणाऱ्यांना ही एक गोळी (४०० मीलीग्रॅम) चघळून खायला लावावी. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही गोळी खाणे आवश्यक आहे.

– या गोळीबाबत खालील काळजी घेणे आवश्यक आहे.

१. रिकाम्या पोटी गोळी खाऊ घालू नये. काहीतरी खाल्ल्यानंतरच ही गोळी खावी.                                                                    २. आजारी बालकांना गोळी देऊ नये. ते बालक ठिक झाल्यानंतर त्याला गोळी देणे.                                                                ३. गोळी खाल्यानंतर काही दुष्परिणाम दिसल्यास क्षार संजिवनी पाजावी. आणखी काही त्रास झाल्याचे वाटल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.                                                                                                                                                        ४. ज्या मुलांच्या पोटात जंताचे प्रमाण जास्त आहे त्यांना गोळी खाल्यानंतर त्रास होण्याची शक्यता असते. तेव्हा जास्त घाबरण्याचे काहीही कारण नाही.

टीप – ही माहिती राज्य आरोग्य विभागाकडून देण्यात आली असून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही उपचार करु नयेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2017 5:33 pm

Web Title: importance of deworming symptoms of it and treatment
Next Stories
1 सायनसपासून बचाव करण्यासाठी करा ‘या’ गोष्टी
2 एकाचवेळी फोनच्या दोन्ही बाजूने करता येणार शूटिंग
3 ‘ओप्पो’, ‘शिओमी’, ‘जिओनी’  कंपनीचा मोबाईल वापरताय? सावधान! 
Just Now!
X