News Flash

अपचनाचे धोके आणि त्यावरील उपाय

अपचन ही एक सामान्य समस्या असून ती वारंवार गॅस्ट्रो एसोफेजेल रेफ्लक्स डिसीज (जीईआरडी) किंवा गॅस्ट्र्रिटिसमुळे होत असते.

डॉ. अजय झवेरी

अपचन, अप्पर ऍबडॉमिनल डिसकंफर्ट असे हि म्हटले जाते, हि सामान्य लक्षणांपैकी एक असून मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या यामुळे प्रभावित होते. ज्यामध्ये पोटाच्या वरच्या भागामध्ये याचा त्रास होतो. खराब पचनक्षमता याचे मुख्य कारण आहे. अपचन ही एक सामान्य समस्या असून ती वारंवार गॅस्ट्रो एसोफेजेल रेफ्लक्स डिसीज (जीईआरडी) किंवा गॅस्ट्र्रिटिसमुळे होत असते. हे कधीकधी पेप्टिक अल्सर रोग (पोट किंवा लहान आतड्याचे अल्सर) किंवा कँसर चे लक्षण असू शकते. कार्यात्मक अपचन हे नॉनअलसर डीसेप्सिया असेही म्हटले जाते. पाश्चात्य देशांमध्ये साधारण 15% लोकसंख्या यामुळे बाधित आहेत.

अपचन सामान्यतः खाण्याच्या दरम्यान किंवा खाल्यानंतर २० ते ४०% प्रौढांमध्ये प्रभाव दिसून येते. अपचनाची काही विविध कारणे अद्याप ओळखणे कठीण आहेत, कारण या पाचन समस्या शरीराला कोणतेही नुकसान करत नाहीत. अल्कोहोल किंवा मांस जास्त प्रमाणात खाणे, उच्च खाद्यपदार्थ किंवा फ्रिज केलेले पेय सर्वात वाईट आहार आहे. तणाव आणि चिंता यामुळे या समस्या निर्माण होऊ शकते, तसेच काही प्रकारचे तीव्र आजार जसे कि २ प्रकारचे मधुमेह, खाद्य विषबाधा किंवा अतिप्रमाणात औषधांचं सेवन.

अपचन इतर सामान्य कारणे – खाण्याच्या वाईट सवयी आणि पाश्चात्य जीवनशैली आणि संस्कृतीचे अनुकरण केल्याने होते. अनियमित वेळी भोजन करणे, जंक पदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन, मसालेदार पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ, कॅफीन असलेले उत्पादनांचा जास्त प्रमाणात वापर करणे. धूम्रपान आणि मद्यपान करणे ही देखील अपचनाची कारणे आहेत.

सर्वात सामान्य लक्षणे म्हणजे पोटात वेदना, जळजळ होणे, मळमळणे, कळ येणे आणि चिंता सतावणे. अन्न पचविण्याच्या अडचणींमुळे वरच्या पोटात खूप वेदना होतात. उलट्या किंवा ढेकर देखील येऊ लागतात. अपचनामुळे बहुतेक वेळा हृदयात जळजळ होते. जे लोक पाचन समस्यांमुळे प्रभावित आहेत त्यांना सामान्यांपेक्षा थोडेसे खाल्यास लवकर पोट भरल्यासारखे जाणवते. कब्ज, अतिसार किंवा जेवणानंतर गॅसमुळे पोट फुगू शकते.

६० वर्षांवरील व्यक्तींनी याची काळजी घेतली पाहिजे. त्यांना एन्डोस्कोपी आणि ऍबडॉमिनल इमेजिंग किंवा सीटी अल्ट्रासाऊंडसह करण्याची गरज भासते. अपचनामध्ये एंडोस्कोपीची प्राथमिक भूमिका म्हणजे गॅस्ट्रिक कर्करोगाचा प्रवेश नाकारणे, जे तरुण रुग्णांमध्ये क्वचितच आढळते. अशा रुग्णांमध्ये डायग्नोसिस लक्षणांच्या आधारे केले जाते किंवा कौटुंबिक गॅस्ट्रिक कँसर ची पार्श्वभूमी असेल तर त्यानुसार केले जाते.

लक्षण – बऱ्याचदा दीर्घ काळ टिकत नाहीत आणि त्यामुळे त्यांना उपचारांची आवश्यकता नसते. सतत अडचणीच्या बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. औषध उपचाराने लक्षणे कमी करू शकतात. क्रॅम्प्स किंवा पोटाच्या वेदनांसाठी, अँटिस्पॅस्मोडिक्स दिले जाऊ शकते, ते एंटासिड्स, कब्ज. मळमळ किंवा लॅक्सेटिव्ह्ज नियंत्रण करण्यास मदत करते. सर्व रुग्णांचे एच. पिलोरीसाठी फिकल अँटीजन वापरून परीक्षण केले पाहिजे. एच. पिलोरी असलेल्या रुग्णांच्या लक्षणांमुळे उन्मूलन उपचारांना प्रतिसाद देते एच. पिलोरी-संबंधित डिस्पेप्सिया असल्यास त्याची चाचणी करण्यास सांगितली जाते. याव्यतिरिक्त, आहार आणि खाण्याच्या सवयी बदलणे तसेच नियमितपणे खेळणे किंवा काही प्रकारचे शारीरिक कार्य करण्याची शिफारस केली जाते.

उपचारांमध्ये प्रामुख्याने एन्टॅकिड्स, प्रोटॉन पंप इनहिबिटर समाविष्ट असतात. दीर्घकाळापर्यंत असणारे अपचन जे निराकरण करीत नाही, ते वृद्ध लोकसंख्येमध्ये विशेषतः तपासली जाणे आवश्यक आहे. हे अंतर्गत घातकपणा किंवा कर्करोगाचे लक्षण असू शकते. हेलिकोबॅक्टर पायरोली हा एक गंभीर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल संसर्ग आहे ज्यास 2 आठवड्यांच्या आत अँटीबायोटिकसह उपचार करणे आवश्यक असते.

मसालेदार अन्न टाळा, काही तासांच्या अंतराने वारंवार जेवण घ्यावे, कॅफिन उत्पादनांचे सेवन टाळावे, उशीरा रात्री जेवण घेणे टाळा आणि आरामदायी जीवनशैली टाळा. नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे, जे एखाद्या व्यक्तीस फिट ठेवण्यास आणि अडचणी टाळण्यास मदत करते. जे लोक मद्यपान किंवा धूम्रपान करतात त्यांनी त्याचे प्रमाण कमी करावे. जेवण नियमित वेळेवर खाल्ले पाहिजे आणि अनियमित वेळेत ते खाणे टाळावे.

(लेखक गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हेपॅटोलॉजिस्ट विभाग, जसलोक हॉस्पीटल अँड रिसर्च सेंटरमध्ये सल्लागार आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2019 4:46 pm

Web Title: importance of fighting dyspepsia nck 90
Next Stories
1 Bajaj CT 110 भारतात लाँच , किंमत 40 हजाराहून कमी
2 ‘शाओमी’चा लोकप्रिय स्मार्टफोन ‘Redmi Note 7 Pro’ चं नवीन व्हेरिअंट लाँच
3 Mahindra XUV300 ऑटोमॅटिक झाली लाँच, किंमत 11.50 लाख रुपये
Just Now!
X