News Flash

‘हे’ आहेत ब्लड प्रेशर कमी करण्याचे घरगुती उपाय

वेळीच काळजी घ्या

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

ब्लडप्रेशर ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे. पूर्वी ब्लडप्रेशर वयस्कर व्यक्तींना होत असे मात्र आता कमी वयाच्या व्यक्तींमध्येही ब्लडप्रेशरची समस्या उद्भवताना दिसते. एकदा ब्लडप्रेशर झाले की, ती समस्या कायम आपल्या सोबत राहते. पण औषधांच्या माध्यमातून त्यावर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येते. सध्याची आपली धकाधकीची जीवनशैली, तणावाचे प्रमाण यांमुळे ही समस्या वेगाने वाढत असल्याचे दिसते. पण घरच्या घरी केलेल्या काही उपायांचा या समस्येवर चांगला उपयोग होतो. औषधांबरोबरच हे उपाय केल्यास ते निश्चितच फायदेशीर ठरतात. हा गंभीर आजार नसला तरीही ती एक समस्या असल्याने ब्लडप्रेशर असलेल्या व्यक्तींना हृदयाचे आजार, स्ट्रोक असे त्रास होण्याची शक्यता जास्त असते. पाहूयात काय आहेत हे घरगुती उपाय…

लसूण

लसूण हा आहारातील एक अतिशय उत्तम पदार्थ आहे. ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी लसूण खूप चांगला औषधी पदार्थ आहे. यामध्ये असलेले एलिसीन शरीरातील नायट्रिक ऑक्साइडचे प्रमाण वाढवते आणि यामुळे आपल्या मांसपेशींना आराम मिळतो. म्हणजेच ब्लडप्रेशरच्या कार्यप्रणालीला आराम मिळतो. यामुळे ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज लसणाची एक पाकळी अवश्य खावी.

शेवगा

शेवग्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन आणि खनिजांचे प्रमाण जास्त असते. ब्लडप्रेशरच्या रुग्णाने मसूरच्या डाळीसोबत शेवग्याचे सेवन केल्यास ते जास्त फायदेशीर ठरते.

जवस

जवसामध्ये अल्फा लिनोनेलिक अ‍ॅसिड जास्त प्रमाणात असते. हे एक प्रकारचे महत्त्वपूर्ण ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आहे. ज्या लोकांना हायपरटेन्शनची समस्या असेल त्यांनी जेवणात जवसाचा उपयोग केल्यास त्याचा फायदा होतो असे काही संशोधनांमधून समोर आले आहे. यामुळे कॉलेस्टेरॉलची मात्रा कमी होते आणि याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.

विलायची

एका संशोधनानुसार विलायचीचे नियमित सेवन केल्यास ब्लडप्रेशर व्यवस्थित राहते. विलायची गुणधर्माने उष्ण असल्याने आपण ती अतिशय कमी प्रमाणात गोड पदार्थांमध्ये वापरतो.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 2:03 pm

Web Title: important home remedies for blood pressure problem try this for good health
Next Stories
1 …म्हणून काकडी फ्रिजमध्ये ठेवून खाऊ नये
2 हे आहे मधुमेहींसाठी उपयुक्त आसन
3 ओएलएक्सप्रमाणे आता फेसबुकवरही करता येणार वस्तूंची खरेदी-विक्री
Just Now!
X