News Flash

मुलाखतीला जाताना ‘ही’ काळजी घ्या

सोप्या आणि महत्त्वाच्या टिप्स

परीक्षा संपल्या असून तरुणांची नोकरी मिळवण्याची धडपड एव्हाना सुरु झाली असेल. काही जण पुढचे शिक्षण घेत नोकरी करण्याचा विचार करत असतात तर काही शिक्षण संपवून नोकरीच्या नव्या टप्प्यात पदार्पण करत असतात. करियरचा हा महत्त्वाचा टप्पा आपल्यापैकी प्रत्येकाच्याच आयुष्यात कधी ना कधी येतो. नोकरी मिळविण्याचा असणारा ताण त्याहीपेक्षा नोकरीच्या मुलाखतीला जाताना तरुणांना जास्त ताण येतो. नेमके कोणते कपडे घालावेत, काय विचारले जाईल, स्वत:ला कसे प्रेझेंट करावे, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे कशाप्रकारे द्यावीत असे एक ना अनेक प्रश्न पडतात. अशाच काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा केलेला प्रयत्न…

१. मुलाखतीला जाण्यापूर्वी 

आपण ज्या कंपनीमध्ये मुलाखतीसाठी जाणार आहोत त्या कंपनीची संपूर्ण माहिती घ्या. कंपनी नेमकी कोणत्या क्षेत्रात काम करते. एकूण मार्केटमध्ये कंपनीचे स्थान काय आहे याबाबत तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. तुमच्या कामाचे स्वरूप तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे मुलाखत देताना तुमची नेमणूक कोणत्या कामासाठी होणार आहे याची खातरजमा करा. तुम्हाला या नोकरीतून असणाऱ्या पगाराची अपेक्षा निश्चिती करा. बायोडेटा तयार करताना त्यात तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, आधीच्या कामाचा अनुभव इत्यादींबाबत सविस्तरपणे नमूद करा.

२. प्रतिक्रिया देताना

मुलाखतीदरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना आत्मविश्वासाने योग्य पद्धतीने उत्तरे द्या. जी उत्तरे तुम्हाला येत नाहीत त्यांनाही आत्मविश्वासाने सामोरे जा. येत नसेल तर स्पष्टपणे माहित नाही. सांगता येणार नाही असे सांगा. तुमतील चांगल्या गोष्टी तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुमच्यात असणाऱ्या मर्यादांचीही तुम्हाला माहिती हवी. तसेच त्या सांगण्याची तयारीही ठेवा. तुमची नवीन गोष्टी शिकण्याची तयारी आहे हे मुलाखत घेणाऱ्यांना समजू द्या. त्यामुळे तुम्हाला नोकरीवर घेण्याचा विचार होण्याची शक्यता जास्त असेल.

३. पेहराव

मुलाखतीला जाताना तुमचा वेश जास्त महत्त्वाचा असतो. कारण इंग्रजीमध्ये असलेल्या एका म्हणीप्रमाणे ”First Impression is last Impression” मुलाखतीमध्ये पेहराव अतिशय महत्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे गढद रंगाचे कपडे घालू नका. ज्या कपड्यांमध्ये तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल असेच कपडे घाला. खूप ढगळे किंवा खूप घट्ट कपडे घालणे टाळा. ट्राउजर आणि फॉर्मल शर्ट, लेगिन्स आणि कुर्ता, पंजाबी ड्रेस हे पर्याय मुलींसाठी चांगले आहेत. मुलांनीही फॉर्मल शर्ट पँट, कम्फर्टेबल असाल तर टाय आणि ब्लेझरही घालू शकता. मेकअप देखील जास्त भडक नसेल याची काळजी घ्या. केस जास्त डोळ्यावर आणि सतत गळ्यात येणार नाहीत अशापद्धतीने बांधून जा.

४. खोटी माहिती देऊ नका

मुलाखतीच्या वेळी तुमची शैक्षणिक, वैयक्तिक तसेच इतर माहिती विचारली जाऊ शकते. अशा वेळी तुम्ही खोटी माहिती देणे योग्य नाही. अशाप्रकारे खोट्या गोष्टी सांगणे तुम्हाला नंतर महागात पडू शकते. खोटी माहिती देऊन तुमची निवड होईल पण काम करण्याच्या वेळी खरं काय ते समोर येईल. त्यामुळे नंतर सगळ्यांसमोर तुम्हाला काही गोष्टी ऐकून घ्याव्या लागतील आणि कदाचित सगळ्यांसमोर तुमचा अपमान होण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही.

५. पुरेशी माहिती घ्या

मुलाखतीस जात असलेल्या संस्थेच्या एचआर डिपार्टमेंटमधील कोणत्या व्यक्तीला ओळखत असाल तर त्याच्याबाबत माहिती घ्या. मुलाखत घेणाऱ्यांविषयी थोडी माहिती ठेवा. एचआरमधील व्यक्तीकडून कंपनीची धोरणे समजून घेण्याचा प्रयत्‍न करावा. प्रश्नाचे उत्तर देताना ज्या कंपनीत नोकरीसाठी आला आहात त्याच कंपनीच्या संदर्भात एखादे उदाहरण वापरा. त्यामुळे तुमचा चांगला आणि वेगळा प्रभाव पडेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2018 2:38 pm

Web Title: important thinks to keep in mind while you are going to give interview
Next Stories
1 सध्याचा घोडेबाजार सोडता ‘या’ पाच गोष्टींसाठी ओळखला जातो कर्नाटक
2 गेल्या ६ वर्षांपासून व्यायाम केला नाहीये? मग हे वाचाच
3 बॅंकेत पैसे ट्रान्सफर करणं झालं सोपं, पेटीएमचं नवं फिचर
Just Now!
X