आपले केस लांब, काळेभोर आणि घनदाट असावेत असे जवळपास सर्वच मुलींना वाटते. पण ही गोष्ट साधायची कशी असा यक्षप्रश्न मात्र त्यांच्यासमोर असतो. जाहिरातीतील मुलींचे काळेभोर सिल्की केस पाहून मग आपले केस असे का नाहीत म्हणत या मुली निराश होत राहतात. आता केसांचा पोत खराब होण्याला प्रदूषण, चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती ही कारणेही असतातच. पण योग्य ती काळजी न घेतल्यानेही केसांचे आरोग्य बिघडते. हे बिघडलेले आरोग्य सुधरवण्यासाठी काही सोप्या गोष्टी केल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो. योग्य ते उपाय माहित नसल्यास बाजारात मिळणारे रसायनयुक्त शाम्पू आणि कंडिशनरचा वापर होतो. परंतु ही महागडी प्रसाधने वापरुनही म्हणावा तितका उपयोग होत नाही. अशावेळी केसांचा पोत सुधारावा आणि ते जाड व्हावेत यासाठी घरगुती उपाय केल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो. पाहूयात घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय

१. अंडी – अंड्यामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असल्याने केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी अंड्याचा चांगला उपयोग होतो. तर अंड्याच्या वापराने केस घनदाट होण्यासही मदत होते. १ किंवा दोन अंडी केसांच्या मुळांशी लावावीत. त्यानंतर साधारण ३० मिनिटे तसेच ठेवावे. मग कोमट पाणी आणि शाम्पूचा वापर करुन केस स्वच्छ धुवावेत.

IAS officer awanish sharan share mpsc examination preparation tip
“इतकंही कठीण नाही” UPSC क्रॅक करण्यासाठी नक्की किती वेळ अभ्यास करावा? खुद्द प्रसिद्ध IAS नं दिल्या टिप्स
How To Avoid Food Poisoning Does Chai Goes Acidic by Heating Twice
चहा, भातासह ‘हे’ ५ पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये, कारण.. तज्ज्ञांनी सांगितलं, अन्नातून होणारी विषबाधा कशी टाळावी?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
cabbage for weight loss
तुमच्या घरी कायम असणारी ‘ही’ भाजी वाढलेले वजन झपाट्याने करेल कमी; लगेच करा रोजच्या जेवणात समावेश

२. कॅस्टर ऑईल – कॅस्टर ऑईलमध्ये व्हीटॅमिन ई आणि फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे केसांचा पोत सुधारण्यास मदत होते. केसांच्या मुळांशी कॅस्टर ऑईलने मसाज केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. ३० मिनिटे हे तेल लावून मग शाम्पूने केस धुवावेत.

३. कोरफड – कोरफडीमध्ये केसांसाठी उपयुक्त असे अनेक घटक असतात. त्यामुळे केसांची मुळे चांगली राहण्यास मदत होते. तसेच केसांतील पेशींची अवस्था सुधारते. चांगल्या परिणामांसाठी कोरफडीची जेल आणि पाणी एकत्र करुन त्याचा स्प्रे केसांवर मारावा. मग गार पाण्याने केस धुवावेत. ही प्रक्रिया आठवड्यातून ३ ते ४ वेळा करावी. त्याचा चांगलाच फायदा होतो. हे शक्य नसल्यास कोरफडीचा जेल मुळाशी लावून थोडा वेळाने केस धुवावेत.

४. ऑलिव्ह ऑईल – ऑलिव्ह ऑईलमध्ये ओमेगा ३ चे प्रमाण जास्त असते. ओमेगा ३ संपूर्ण शरीरासाठी आणि केसासाठी आवश्यक असते. यामुळे केस घनदाट होण्यासाठी उपयोग होतो. तुमच्या शरीराच्या तापमानाइतके तेल तापवून ते केसांच्या मुळांशी लावून ३० ते ४५ मिनिटांसाठी ठेवावे. त्यानंतर केस शाम्पूने धुवून टाकावेत.