06 March 2021

News Flash

ऑनलाइन शॉपिंग करताना ‘ही’ काळजी घ्या

आर्थिक नुकसान टाळण्यासाठीच्या खास टिप्स

सणवार जवळ आले की खरेदीला अक्षरशः उधाण येते. किती आणि काय घेऊ असे अनेकांना होऊन जाते. मग हातात मोबाईल आणि समोर लॅपटॉप असताना दुकानात जाऊन वस्तू खरेदी करण्यापेक्षा ऑनलाईन शॉपिंग करण्यालाच प्राधान्य दिले जाते. यामध्ये उपलब्ध असणारे पर्याय आणि घरबसल्या हवी तशी खरेदी करता येत असल्याने हा ट्रेंड वाढला आहे. मनापासून आणि मनभरेपर्यंत खरेदी करणे यात वाईट काहीच नाही. मात्र ते करताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. नाहीतर तुम्ही फसवले जाण्याचे किंवा तुमचे आर्थिक नुकसान होण्याचे प्रकार घडू शकतात.

वृत्तपत्रातील डिस्काऊंट ऑफर्स

सणावारांच्या दिवसात वृत्तपत्रात पानेच्या पाने विविध वस्तूंच्या आणि कपड्यांच्या खरेदीशी निगडीत जाहिराती येतात. यामध्ये इतके रुपयांची खरेदी केल्यास इतकी सूट. या गोष्टी खरेदी केल्यास त्यावर विशिष्ट टक्के डिस्काऊंट अशा ग्राहकांना भुरळ घालणाऱ्या जाहिराती केल्या जातात. अशाप्रकारच्या सूट पाहून ग्राहकही आकर्षित होतात. याशिवाय तुम्ही विशिष्ट कंपनीच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरुन खरेदी केल्यास तुम्हाला ठराविक टक्के डिस्काऊंट मिळेल असेही यामध्ये दिलेले असते. मात्र प्रत्यक्षात त्या वस्तू घ्यायला गेल्यावर सांगण्यात आलेले हे डिस्काऊंट जुन्या वस्तूंवर असल्याचे आपल्याला समजते. याशिवाय काही ठराविक गोष्टींवरच हे डिस्काऊंट असते. त्यामुळे योग्य ती पडताळणी करुन मगच व्यवहार करावा.

एक्सचेंज ऑफर

ऑनलाईन खरेदीमध्ये अनेक उत्पादनांवर केवळ डिस्काऊंट नाही तर एक्सचेंज ऑफर असते. अशा प्रकारच्या ऑफर्स दिसायला आकर्षक असल्या तरीही आपण आपली जुनी वस्तू अतिशय कमी किंमतीत देऊन बसतो.

विमान तिकीटांवर मिळणाऱ्या ऑफर्स 

आपल्याला मेलवर अनेकदा विविध प्रकारच्या जाहिरातींचे मेल येतात. यामध्ये विमान प्रवासाच्या तिकिटांशी निगडीत मेल असतात. यामध्ये भरगच्च डिस्काऊंट दिले जाते. त्यातच आपल्याला ऑफिसच्या किंवा वैयक्तिक कारणाने कुठे बाहेरगावी किंवा बाहेर देशात जायचे असल्यास तुम्ही अशाप्रकारचे मेल उघडता आणि या प्रलोभनांना बळी पडता. त्यामुळे आपल्याला जे डिस्काऊंट वाटते ते डिस्काऊंट नसून तिकिटांची मूळ किंमत असते. यावर टॅक्स लागू केल्यावर ही किंमत सामान्य तिकिटाइतकीच होते.

अॅप अलर्ट

आपल्या मोबाईलमध्ये विविध प्रकारची अॅप्लिकेशन्स असतात. या अॅप्लिकेशन्सवर आकर्षक अशा ऑफर्सचे मेसेज येत असतात. खरेदी करण्यास उत्सुक असणारे लोक अतिशय कौतुकाने या सगळ्या ऑफर्स पहातात. अनेक जण या ऑफर्सला बळी पडतात आणि आपल्याकडचे पैसे घालवून बसतात.

विशिष्ट कालावधीसाठी असणाऱ्या ऑफर्स

सणावारांच्या दिवसात किंवा काही विशिष्ट दिवसांमध्ये कंपन्यांकडून विशेष ऑफर्स देण्यात येतात. त्यामुळे तुम्हाला जर एखादी गोष्ट आवडली तर ती लगेच घ्या. कारण त्यानंतर त्यावरील ऑफर संपलेली असेल आणि त्यानंतर जर तुम्ही चुकून ती वस्तू खरेदी केली तर तुम्हाला ती जास्त किंमतीला घ्यावी लागते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2017 11:06 am

Web Title: important tips while doing online shopping
Next Stories
1 नंबर बदलला, चिंता नको! व्हॉट्स अॅपचे हे नवे फिचर ठरणार फायदेशीर
2 …म्हणून जेवल्यानंतर लगेच झोपू नका
3 विशिष्ट प्रशिक्षण पद्धतीने मेंदूच्या क्षमतेत वाढ शक्य
Just Now!
X