01 June 2020

News Flash

Realme च्या ‘या’ फोनचा पहिलाच सेल…फक्त तीन मिनिटात विकले 70 हजार स्मार्टफोन

फक्त 128 सेकंदांमध्ये झाली 70 हजार स्मार्टफोनची विक्री...

Realme कंपनीने गेल्या आठवड्यात भारतामध्ये आपल्या नवीन Narzo सीरिजचे Narzo 10 आणि Narzo 10A हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले. या दोन स्मार्टफोनद्वारे परवडणाऱ्या किंमतीमध्ये दमदार फीचर्स देण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. यातील Narzo 10 हा स्मार्टफोन काल (दि.18) पहिल्यांदाच भारतात सेलमध्ये उपलब्ध करण्यात आला होता. पहिल्याच सेलमध्ये या फोनला ग्राहकांनी शानदार प्रतिसाद दिला.

फ्लिपकार्ट आणि Realme.com या संकेतस्थळांवर दुपारी 12 वाजता सेल सुरू झाल्यानंतर तीन मिनिटांमध्येच तब्बल 70 हजार Narzo 10 स्मार्टफोनची विक्री झाली असा दावा कंपनीने केलाय. फक्त 128 सेकंदांमध्ये Narzo 10 फोनच्या 70 हजार युनिट्सची विक्री झाली, अशी माहिती रिअलमी इंडियाचे प्रमुख माधव सेठ यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

Realme Narzo 10 स्पेसिफिकेशन्स:-
Realme Narzo 10 ग्रीन आणि व्हाइट अशा दोन कलरमध्ये खरेदी करता येईल. Realme Narzo 10 मध्ये 6.5 इंचाचा HD+ डिस्प्ले असून स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप स्टाइल नॉच आहे. MediaTek Helio G80 चिपसेटचा यामध्ये वापर करण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅमसोबत 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. डोळ्यांची विशेष काळजी घेण्यासाठी यामध्ये आय-केअर मोड आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप मिळतो. यातील 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. तर अन्य तीन कॅमेरे अनुक्रमे 8 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सलचे आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात AI सपोर्टसह 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. सुपर नाइटस्केप मोडचाही पर्याय यामध्ये युजर्सना मिळेल. याशिवाय फोनमध्ये फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरी मिळेल. 11,999 रुपये इतकी Narzo 10 या स्मार्टफोनची किंमत कंपनीने ठेवली आहे. याशिवाय, कंपनीचा दुसरा नवीन स्मार्टफोन Narzo 10A साठी २२ मे रोजी सेल आयोजित केला जाणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2020 10:02 am

Web Title: in less than 3 minutes realme sells over 70000 narzo 10 units sas 89
Next Stories
1 Redmi Note 9 Pro खरेदी करण्याची अजून एक संधी, जाणून घ्या ऑफर्स
2 टिकटॉक व्हिडीओद्वारे उडवली अॅसिड हल्ल्याची खिल्ली; तक्रारीनंतर टिकटॉकची कारवाई
3 प्रेमासाठी वाट्टेल ते…! प्रेयसीला भेटण्यासाठी १३०० किमी पायपीट, पोहचल्यावर…
Just Now!
X