जपानमधील टोहोकू विद्यापीठाचे संशोधन

गर्भारपणात महिलांनी मासे सेवन केले तर त्यामुळे मेदाम्लांचा समतोल साधला जाऊन नवजात बालकांच्या मेंदूचा विकास चांगला होतो, असे एका अभ्यासात दिसून आले आहे. संशोधकांनी म्हटले आहे की, गर्भारपणात मासे सेवन व मुलांच्या मेंदूचे आरोग्य यात घनिष्ठ संबंध असतो.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
100 gram raw garlic revealing impressive impact on our lives how garlic boost your immune system said expert
१०० ग्रॅम लसणात आहेत ‘हे’ पोषक घटक; उच्च रक्तदाबामध्ये ठरेल वरदान, वाचा तज्ज्ञांची मते…

ओमेगा ६ व ओमेगा ३ ही मेदाम्ले प्राणी व मानवाच्या मेंदूच्या विकासात मोठी भूमिका पार पाडत असतात. जपानमधील टोहोकू विद्यापीठाच्या नोरिको ओसुमी यांनी याबाबत संशोधन केले असून त्यांच्या मते लिपीडस म्हणजे मेदाम्लांमुळे मेंदूची वाढ चांगली होते. उंदारला ओमेगा ६ व ओमेगा ३ कमी असलेले अन्न दिले तर त्यांच्या पिलांचा मेंदू लहान असतो व त्यात प्रौढपणी भावनिक वर्तनही विचित्र असते. अनेक देशांत लोकांचे आहार योग्य नसतात ते केवळ तेलबियांचे तेल आहारात समाविष्ट करतात त्यात माशांमधील ओमेगा ३ मेदाम्ले नसतात.  मेंदूची वाढ पूर्णपणे न होण्याचे कारण हे माशांचे सेवन नसणे किंवा ओमेगा ३ मेदाम्लांचा कमी उपयोग हे असते, त्यामुळे मेंदूची वाढ नीट होत नाही.

गर्भातील मेंदूशी संबंधित मूलपेशी लवकर जुन्या होतात, त्यामुळे ओमेगा ६ व ओमेगा ३ मेदाम्लांचा समतोल सांभाळणे गरजेचे असते. हा समतोल न पाळणाऱ्या महिलांच्या अपत्यात नैराश्य जास्त असते.

जरी महिलेचा आहार चांगला असला तरी ओमेगा मेदाम्लांचा समतोल नसेल तर फायदा होत नाही. ओमेगा ३ नसेल तर मुलांचा मेंदू योग्य पद्धतीने विकसित होत नाही. याबाबत आधीही संशोधन झाले आहे व ओमेगा ६ व ओमेगा ३ मेदाम्लांचा समतोल किती आवश्यक असतो हेच यातून दिसून येते. गर्भारपणात महिलांनी मासे सेवन केले तर मुलांच्या मेंदूचे आरोग्य चांगले राहते.